धक्कादायक....आंधळगांव उपकेंद्रातून 1 लाख 25 हजार रुपये किमतीच्या कॉपर वायरची चोरी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, December 3, 2022

धक्कादायक....आंधळगांव उपकेंद्रातून 1 लाख 25 हजार रुपये किमतीच्या कॉपर वायरची चोरी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल.....

मंगळवेढा/प्रतिनिधी आंधळगांव येथील महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीच्या 33 के.व्ही. उपकेंद्रातील बंद अवस्थेत असलेला ट्रान्स्फार्ममधील 1500 किलो वजनाचे 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे कॉपर वायर चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी कनिष्ठ अभियंता महेश पारवे हे 2015 पासून तेथे कार्यरत आहेत. येथील उपकेंद्रामधून ट्रान्स्फार्मर हा 2021 पासून बंद अवस्थेत असल्याने त्याच्या जागेवर दुसरा नवीन ट्रान्स्फार्मर बसविण्यात आला आहे.
सदर ट्रान्स्फार्मर हा बाजूला काढून ठेवण्यात आला होता.दि.16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वा. फिर्यादी व वरिष्ठ यंत्र चालक अविनाश नागणे हे दोघे केंद्रातील साफसफाई करण्यास गेल्यावर सायंकाळी 4.00 वा. त्या ट्रान्स्फार्मरची मोडतोड होवून 1 लाख 25 हजार रुपये किमतीची तसेच 1500 किलो वजनाची कॉपर वायडींग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.याचा सर्वत्र आजूबाजूला शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही.

Pages