दिव्य न्यूज नेटवर्कमंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसर्या दिवशी सरपंचपदासाठी 9 तर सदस्य पदासाठी 79 असे एकूण 88 उमेदवारी अर्ज बुधवारअखेर प्राप्त झाल्याचे नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे - भालेवाडी -सरपंचपद 1,सदस्य-9,पौट -सरपंचपद 1,सदस्य-13,ढवळस सरपंचपद 1,सदस्य 5,शिरनांदगी- सरपंचपद 0,सदस्य -3,मारोळी -सरपंच 0,सदस्य -3,डोंगरगांव-सरपंच-3,सदस्य -8,हाजापूर -सरपंच 1,सदस्य-3,येड्राव -सरपंच 1,सदस्य-13,मारापूर-सरपंच 1,सदस्य-11,सोड्डी -सरपंच 0,सदस्य -4,तळसंगी सरपंच -0,सदस्य -2,पाटखळ -सरपंच 0,सदस्य -4,तर खोमनाळ,बावची,रहाटेवाडी,गोणेवाडी,फटेवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्यासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.दि.2 डिसेंबरच्या दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत असून दि.5 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी तर दि.7 रोजी दुपारी 3.00 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणे व 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत 18 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय आवारात 12 टेबल ठेवण्यात आले असून यासाठी 7 मंडल अधिकारी,18 तलाठी,पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आदी कर्मचारी नेमले आहेत. निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक उमाकांत मोरे हे परिश्रम घेत आहेत.
Wednesday, November 30, 2022

Home
मंगळवेढा विशेष
मंगळवेढ्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी बुधवारी सरपंच व सदस्य पदासाठी 88 उमेदवारी अर्ज तर पहा कोणत्या ग्रामपंचायतचे किती अर्ज दाखल.....