मंगळवेढ्यातील 18 गावच्या सरपंचपदासाठी 119 तर सदस्यासाठी 624 अर्ज वैध 11 उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, December 6, 2022

मंगळवेढ्यातील 18 गावच्या सरपंचपदासाठी 119 तर सदस्यासाठी 624 अर्ज वैध 11 उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध.....

मंगळवेढा/प्रतिनिधी
तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 119 तर सदस्य पदासाठी 624 वैध अर्ज राहिले असून यामध्ये 11 सदस्यांचे अर्ज अवैध छाननीमध्ये ठरले असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
गावनिहाय
सरपंच व सदस्यपदासाठी वैध अर्जाची संख्या -खोमनाळ सरपंच-6,सदस्य-34,1 अवैध सदस्य,भालेवाडी -सरपंच- 5,सदस्य-30,1 अवैध सदस्य,पौट-सरपंच-7,सदस्य 29,1 अवैध सदस्य,बावची-सरपंच-10,सदस्य-24,गुंजेगाव-सरपंच-5,सदस्य -34,ढवळस-सरपंच-9,सदस्य-35,2 अवैध सदस्य,शिरनांदगी- सरपंच -6,सदस्य-45,1 अवैध सदस्य,मारोळी-सरपंच-7,सदस्य-33,रहाटेवाडी-सरपंच-3,सदस्य-27,डोंगरगांव-सरपंच-8,सदस्य-52,हाजापूर-सरपंच-3,सदस्य-10,गोणेवाडी-सरपंच-6,सदस्य-44,3 अवैध सदस्य,येड्राव-सरपंच -9,सदस्य-37,2 अवैध सदस्य,मारापूर-सरपंच -7,सदस्य-41,सोड्डी -सरपंच-5,सदस्य-28,तळसंगी-सरपंच 5,सदस्य-54,पाटखळ-सरपंच -13,सदस्य-49,फटेवाडी-सरपंच 5,सदस्य-23 असे एकूण सरपंच पदासाठी 119 तर सदस्य पदासाठी 624 अर्ज वैध ठरले आहेत. तर 11 सदस्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
क्षसकाळी 11.00 ते 3.00 या वेळेत उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.यावेळी तहसील कार्यालय आवारात उमेदवारानी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. कोणत्या उमेदवाराचे अर्ज बाद होतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.अर्ज माघारी घेण्याचा दि.7 रोजी दुपारी 3.00 पर्यंत असल्याने त्या नंतरच निवडणूक उमेदवारांचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Pages