मंगळवेढा आपहरण झालेल्या त्या बालकाच्या घटनास्थळाला पाेलीस अधिक्षकांची भेट.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 29, 2022

मंगळवेढा आपहरण झालेल्या त्या बालकाच्या घटनास्थळाला पाेलीस अधिक्षकांची भेट....

मंगळवेढा/प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरातून पळवून नेलेल्या त्या बालकाच्या घटना स्थळाची पाेलीस अधिक्षक शिरीषकुमार देशपांडे यांनी प्रत्यक्ष पहाणी करून सखाेल माहीती जानुन घेतली तसेच कुटुंबीयांना भेटून मुलाला बाबत चाैकशीही केली .दरम्यान तपास वेगाने करन्यासाठी जिल्हातील सर्व उपविभागीय कार्यालयातील दाेन तज्ञ कर्मचारी यांना याेग्य मार्गदर्शन करन्यात येऊन शाेधासाठी पाचारण करन्यात आले. दि.१८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता चारवर्षीय मुलाचे आज्ञाताने अपहरण केले आहे.या घटनेला दहा दिवस उलटून गेले आसतानाही तपास लागत नसल्याने आज खुद्द पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सायंकाळी ६ वाजता एम.आय.डी.सी.तील घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली त्या मुलाच्या आई-वडिलांशी चर्चा केली.
तपासासाठी यापूर्वी नऊ पथके कार्यरत होती अद्यापही तपास लागत नसल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक डीवायएसपी कार्यालयातील प्रत्येकी दोन तज्ञ कर्मचारी घेण्यात आले असून या टीमला योग्य मार्गदर्शन करण्यात आले,पोलिसांनी आतापर्यंत श्वान पथकाचाही शाेधासाठी मदत घेतली. २० नातेवाईकांचे फिंगरप्रिंट यापुर्वीच घेतले आहेत.होडीच्या माध्यमातून माण व भीमा नदीतही शोध घेतला मात्र कुठेही ते मिळू शकले नाही.संशयत बाेंधू महाराज यांचेकडेही चाैकशी करन्याची मागणी हाेतेय,शेवटचा पर्याय म्हणून नातेवाईकांची नार्काे टेस्ट द्वारे पडताऴणी केल्यास सत्यता बाहेर येईल आशी चर्चा शहरात हाेत आह.
तपास सर्व बाजूने सुरु असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत केली आहे,गुन्हा उघड करण्यसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिरीष सरदेशपांडे,पाेलीस अधिक्षक,साेलापुर

Pages