डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी :- विजयकुमार कांबळे - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 7, 2022

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी :- विजयकुमार कांबळे

पंढरपूर /प्रतिनिधि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पंढरपूर शहराध्यक्षपदी म मराठी डिजिटल मीडियाचे उपसंपादक विजयकुमार कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी वादळ न्यूजचे कबीर देवकुळे यांची निवड करण्यात आली.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहराचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पंढरपूर शहर सचिवपदी स्वराज्य माझाचे प्रतिनिधि अमोल गुरव ,तर खजिनदारपदी रोखठोक न्यूजचे संपादक अशपाक तांबोळी यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शहराध्यक्ष विजयकुमार कांबळे यांनी कळविले आहे.
डिजिटल मीडियातील ज्या संपादक ,प्रतिनिधि पत्रकारांना संघटनेत सहभागी होऊन कार्यकारणीत काम करण्याची इच्छा असेल त्यांनी संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहनही श्री. विजयकुमार कांबळे यांनी केले आहे.या बैठकीला राजेंद्रकुमार काळे ,अपराजित सर्वगोड,बाहुबली जैन,रघुनाथ पवार,प्रकाश सरताळे, सचिन कुलकर्णी,ज्ञानेश चंडोळे,इत्यादि पत्रकार बांधव उपस्थित होते. प्रिंट मीडिया सोबतच इलेक्ट्रॉनिक मीडिया सद्यस्थितीला महत्वाची भूमिका पार पाडत आहे. पत्रकारिता ही कोण्या एकाची मक्तेदारी नसून ज्यां त्या पत्रकाराने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून वंचित घटकाला न्याय दयावा. सर्व पत्रकार बांधवांना सोबत ,विश्वासात घेऊन या पूढे आपण काम करणार असून यासह त्यांच्या अडचणी ,समस्या निःपक्षपातीपणे सोडवू तसेच शासन दरबारी असणाऱ्या विविध योजनेसाठी संघटनेच्या मदतीने आपण त्याचा एकत्रित पाठपुरावा करू विजयकुमार कांबळे , शहराध्यक्ष,पंढरपूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना

Pages