प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, September 22, 2022

प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू...

ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा स्वेरीत उपलब्ध..... पंढरपूर/प्रतिनिधी प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. २१ सप्टेंबर २०२२ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.०४ ऑक्टोबर २०२२ (सायं. ४.०० वाजेपर्यंत) चालणार आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली मूळ कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि.०४ ऑक्टोबर २०२२ (सायं.४.०० वाजेपर्यंत) चालेल. रजिस्ट्रेशन साठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल/नंबर सोबत असावा. ज्यांनी केवळ जेईई ही परीक्षा दिलेली आहे त्यांनाच रजिस्ट्रेशन शुल्क (खुला प्रवर्ग-८०० रु.आणि इतर प्रवर्ग-६०० रु.) भरावे लागेल. ज्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षा दिलेली आहे त्यांना कोणतेही शुल्क या रजिस्ट्रेशन साठी भरावे लागणार नाही. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. या वर्षी प्रवेशासाठी ऑनलाईन भरलेल्या अर्जाचे कन्फर्मेशन करण्यासाठी यावेळी केवळ 'ऑफलाइन' हा पर्याय उपलब्ध आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम, द्वितीय व तृतीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे.अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे (९५४५५५३८७८) व प्रा. यु. एल.अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Pages