मंगळवेढा पोलिस ठाण्यात नवरात्र महोत्सवानिमित्त मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न..... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, September 21, 2022

मंगळवेढा पोलिस ठाण्यात नवरात्र महोत्सवानिमित्त मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न.....

शेवटच्या श्वासा पर्यंत मंगळवेढेकरांना मदत करनार :- पाेलीस निरीक्षक रणजित माने दिव्य न्यूज नेटवर्क मंगळवेढा येथे दि.26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान नवरात्रोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही साजरा होत असल्याने या पार्श्‍वभूमीवर मंगळवेढा पोलिस ठाण्यात शक्तीदेवी मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी अडीअडचणी समजून घेवून मार्गदर्शनपर सूचना केल्या.दरम्यान मंगळवेढयातील नागरिकांना अखेरचा श्‍वास असेपर्यंत मदत करणार अशी ग्वाही पोलिस निरिक्षक माने यांनी यावेळी उपस्थितांना दिली. या बैठकीत न.पा.पक्षनेते अजित जगताप म्हणाले,शहरामध्ये मोठया प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत.मिरवणूक मार्गामध्ये झाडांच्या फांदया वाढल्याने मिरवणूक वेळी त्या अडचणीच्या ठरत असल्याने नगरपालिकेने रस्ते दुरुस्ती व फांदया कटाईचे काम करून घ्यावे.देवीची सजावट पाहण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागासह अन्य तालुक्यातून भाविक भक्त येत असल्याने महिलांचे मंगळसुत्र व मोबाईल चोरण्याचा पुर्वीचा अनुभव पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून महिलांच्या दागिन्यांची सुरक्षितेची काळजी घ्यावी.फिरोज मुलाणी म्हणाले,चोर्‍या रोखण्यासाठी शहरातील प्रत्येक चौकामधून व्यापारी व सराफ दुकानदार,बँका,पतसंस्था यांनी सी सी टि.व्ही.कॅमेरे बसवून शहराचे संरक्षण करावे. पोलिस निरिक्षक रणजित माने म्हणाले,शहरातील रस्ते अरूंद असून दुकानदार दुकानाचे बोर्ड रस्त्यावर लावत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.परिणामी शहरातील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी व्यापार्‍यांनी रस्त्यावर दुकानाचे फलक ठेवू नयेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला.प्रत्येक मंडळांनी सी.सी.टि.व्ही.कॅमेरे बसवून होणार्‍या चोर्‍यांना अटकाव करावा.व शहरातील दानशूर व्यक्तींनी स्वयंस्फुर्तीने पुढे येवून कॅमेरे बसविण्यास पुढे यावे आवाहन त्यांनी केले.
पोलिसांची संख्या कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी पोलिस बंदोबस्त देणे शक्य नाही अशा प्रसंगी प्रत्येक नागरिक हा बिगर गणवेशातील पोलिस समजून त्याने मिरवणूक प्रसंगी मदत करावी,नवरात्र उत्सव मंडळांना घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करून शक्तीदेवी उत्सव साजरा करावा. मंडप रस्त्यावर उभा करू नये.शक्तीदेवी मुर्तीजवळ कोणताही प्राणी जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.मुर्ती पावसाने भिजणार नाही,मंडप हा मजबूत व सुरक्षित असावा,लाईन स्पार्किंग होणार नाही, श्री.शक्तीदेवीची स्थापना झालेपासून विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कमीत कमी पाच सदस्य व पदाधिकारी 24 तास जागरूक असणे गरजेचे आहे.इतर धर्मियांच्या भावना दुखावतील अशी गाणी वाजवू नयेत,डॉल्बी सिस्टिम लावण्यावर बंदी असल्याने ती लावू नये,परवानगीशिवाय स्पिकर लावता येणार नाही तसेच मिरवणूकही काढता येणार नाही.पोलिसांनी दिलेल्या परवाना फॉर्ममधील अटी व सुचनांचे पालन करणे मंडळास बंधनकारक आहे. या बैठकीला माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड,युवराज कलुबर्मे,गौरीशंकर बुरकूल,दत्तात्रय सावंत,सदाशिव कोंडुभैरी,सोमनाथ बुरजे,अशोक भगत,चंद्रकांत कोंडुभैरी,नगरपालिका प्रशासनाधिकारी विनायक साळुंखे,सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे,सत्यजीत आवटे यांचेसह शहर व ग्रामीण भागातील प्रतिष्ठीत नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते,पोलिस पाटील उपस्थित होते.

Pages