मंगळवेढा/प्रतिनिधी
ब्रह्मपुरी येथे एका २७ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून शेतातील आंब्याच्या झाडाला नाँयलाईनच्या दाेरीने गऴफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. लिंगदेव किसन कोकरे असे त्या गळफास घेणार्या युवकाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील मयताचे कुटूंबिय शेतात राहावयास आसुन साेमवारी सायंकाळी ६.३० जाेरात पाऊस पडत आसल्याने घरातील सर्वजण घरामध्ये बसले होते. यावेळी मयत लिंगदेव हा घरात कोणास काही न सांगता घरातून निघून गेला पाऊस कमी झाल्यावर रात्री ८.३० वाजता बाथरूम साठी यातील खबर देणारा मयताचा भाऊ अनिल हा घराच्या पाठीमागे गेल्यावर आंब्याच्या झाडाला लिंगदेव याने गळफास घेतल्याचे दिसून आले. खबर देणारे यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरातील सगळेजण आले व जवळ जाऊन पाहिले असता गळफास घेतल्याची खात्री झाली .मताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
Tuesday, September 13, 2022
