सोलापूर/प्रतिनिधी
जुळे सोलापूर परिसरातील सैफुल चौक ते बॉम्बे पार्क रस्त्यावरच्या कृष्णा कॉलनी आणि साई पॅराडाईज गृहनिर्माण सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.सरकारच्या 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत सेवानिवृत्त डॉ.कृष्णात भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंञ्याची ७५ वर्षै अर्थात अमृतमहोत्सव आणि सेवानिवृत्त डाॅक्टर तथा दादाश्री ट्रेडिंग कंपनीचे मालक श्रीयुत कृष्णात भोसले यांचं अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण हा योगायोग साधून श्री भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं
अशोक उद्धेवाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.ध्वजारोहण सोहळ्यातून येथे भारतमाता,राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचा जागर झाला.ज्येष्ठ समाजसेवक,प्राणी-पक्षी मिञ तथा सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. बबनराव कांबळे यांनी 'हर घर तिरंगा' या उपक्रमाच्या संकल्पनेसह महत्त्व विषद केले प्रा.रावसाहेब देशमुख,ज्येष्ठ पत्रकार,सोलापूर आकाशवाणीचे वृत्तनिवेदक आणि डिजीटल मिडीया संपादक पञकार संघटनेच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य शिवाजी भोसले तसेच शोभा कुलकर्णी-डंके यांची समयोचित भाषणे झाली.
या प्रसंगी साई पॅराडाईज गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष एस.आर. डंके, डॉ. सुजाता बिराजदार-पाटील, सबन शिवटे,चंद्रकांत अलदी, सेवानिवृत्त एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर घंटे,मारूती वाघमारे, सुरेश खरसाडे, महंमद शिरवळ,विद्या कोळी,निर्मल बंन्नी, सौ.वाघमारे, सौ. माशाळ यांच्यासह दोन्ही सोसायट्यांचे पदाधिकारी, सभासद, दूकान व्यावसायीक आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बबनराव कांबळे यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
Saturday, August 13, 2022
