मंगळवेढा/ प्रतिनिधी
सोड्डी येथे एका 26 वर्षीय विवाहित महिलेस तू मला आवडतेस, मला तुझ्याशी काही तरी बोलायचे असे म्हणून घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी महेश सिद्राम कावडे याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस सुत्रानी दिलेली माहिती अशी, यातील 26 वर्षीय पिडीत विवाहितेचे पती, मुलगा रात्रीच्या वेळी वास्तुशांतीनिमित्त असलेल्या नाटय कार्यक्रमास गेल्यावर यातील आरोपीने रात्री 11.30 वाजता घराचा दरवाजा वाजवल्यावर फिर्यादीने कोण आहे असे विचारले असता बाहेरून मी तुझा मामा आहे, दार उघड असे आरोपीने सांगितल्यावर घरात कोणीच नाही, मी एकटी आहे, काय काम आहे सांगा असे फिर्यादी म्हणाले असता तू मला आवडतेस, मला तुझ्याशी काहीतरी बोलावयाचे असे म्हणून दरवाजा आरोपी वाजवू लागला. यावेळी फिर्यादी घाबरलेल्या मनस्थितीत असल्याने दार उघडले नाही म्हणून आरोपी घरावर चढून घराचा पत्रा उघडण्याचा प्रयत्न करू लागला.
यावेळी फिर्यादी घाबरून दाराची कडी उघडून बाहेर आले असता आरोपी घरावरून उतरून फिर्यादीच्या अंगाशी झोंबाझोंबी करू लागला असता फिर्यादीने घाबरून आरडाओरडा केल्यावर अंधाराचा फायदा घेवून आरोपी पळून गेला. सहा महिन्यापुर्वी पासून त्याची फिर्यादीवर वाईट नजर असल्याने त्याने दोन वेळा वाईट हेतूने हात धरला होता मात्र फिर्यादीने अब्रुच्या भीतीपोटी कोणाशी काही सांगितले नसल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने केलेल्या झटापटीत फिर्यादीच्या गळयातील मणीमंगळसुत्र कोठेतरी पडून गहाळ झाले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादीचा पती, सासरा घरी आल्यानंतर घडलेली हकीकत सांगितल्यावर याचा जाब आरोपीस विचारल्यानंतर आरोपीचे वडील सिद्धाराम कावडे व त्याची आई कमलाबाई कावडे यांनी फिर्यादीचा पती व सासरे यांना शिवीगाळी,दमदाटी केली असल्याचे म्हटले आहे.
Thursday, August 11, 2022

Home
मंगळवेढा विशेष
सोड्डी येथे एका 26 वर्षीय विवाहितेला तु मला आवडतेस आसे म्हणून केला विनयभंग एका विरूद्ध गुन्हा दाखल....