दामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका ....... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 9, 2022

दामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......

कामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही संस्था अबाधित राहावी यासाठी नेहमी त्यागाची भूमिका घेतली आहे मात्र सत्ताधाऱ्यांकडून गेली ९ महिन्यापासून पगारी दिल्या नाहीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवल्या नाहीत हे आंदोलनात कर्मचारी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत.केवळ आश्वासनाची बोळवण केल्याने संतप्त कामगारांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेदना समजून न घेता कामगारांच्या चळवळीला कोणीही बदनाम करू नये असा इशारा कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सुनील ठेंगील, सेक्रेटरी भारत मासाळ व पंडित पाटील यांनी दिला आहे.
एकीकडे दामाजीचे कारभारी कारखाना कामगारांच्या योगदानामुळे सुरळीत सुरू आहे असे सांगत आहेत तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते हे आंदोलन कामगारांना दमदाटी करून सुरू केल्याची खोटी अफवा पसरवत आहेत. कामगारांशी कोणतीही वाटाघाटी न करता परस्पर काहीही वक्तव्ये करून कामगारांच्या भावनेशी कोणीही खेळू नये.कारखाना प्रशासनाने कामगारांचा ३१ महिने प्रॉव्हिडंट फंड भरला नाही. त्यामुळे ज्या कर्मचा-याचे ५८ वर्ष वय पूर्ण झाले आहे व जे निवृत्त झाले आहेत त्यांना पेंशनचा लाभ मिळत नसलेने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. जे कर्मचारी कोरोनात मयत झाले त्या कुटुंबाला प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे.गेले चार वर्षांपासून पगारीबाबत कामगारांची हेळसांड झाली आहे. यामुळे कामगार आर्थिक संकटात सापडला आहे.
अशा परस्थितीत कामगारांविषयी द्वेष पसरवण्यापेक्षा त्याची दुःखे जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यास सत्ताधाऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे मात्र असे काही न करता कामगार चळवळ बदनाम करून आंदोलन मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे मात्र कामगारांची एकजूट पाहता मागण्या मान्य होईपर्यत या आंदोलनाचा लढा सुरू राहील असा खणखणीत इशारा कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सुनील ठेंगील,सेक्रेटरी भारत मासाळ व पंडित पाटील यांनी दिला आहे

Pages