आ.समाधान आवताडेंचा पराभव कोणीही रोखू शकत नाही :- अँड.नंदकुमार पवार - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, July 10, 2022

आ.समाधान आवताडेंचा पराभव कोणीही रोखू शकत नाही :- अँड.नंदकुमार पवार

मंगळवेढा/प्रतिनिधी हिटलरशाहीने कारभार करणाऱ्या आ.समाधान आवताडे चा पराभव कोणीही रोखू शकत नाही सत्ता बदल न झाल्यास कायमस्वरूपी सभासदत्वास मुकणार असून श्री.संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात सभासदात मोठा रोष असून सत्ता बदल करणे गरजेचे असल्याचे अँड.नंदकुमार पवार यांनी बोलताना व्यक्त केले. समविचारी गटाच्या प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर दामोदर देशमुख,रामकृष्ण नागणे, शिवाजीराव काळुंगे,यादाप्पा माळी शिवानंद पाटील,अजित जगताप,पांडुरंग चौगुले,तानाजी खरात,रामचंद्र वाकडे,मुरलीधर दत्तू,गौरीशंकर बुरुकुल,गोपाळ भगरे,नितीन नकाते,भारत पाटील,बसवराज पाटील,तानाजी काकडे,रमेश भांजे,पांडुरंग भाकरे,चंद्रशेखर कौडूभैरी,सोमनाथ माळी,पी.बी.पाटील,भारत बेदरे औदुंबर वाडदेकर राजेद्र पाटील,अशोक चौंडे,सुरेश कोळेकर आदीसह कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड.पवार म्हणाले की आम्ही दामाजीवरील सत्ता सोडताना साखर गॅस मोलॅसिस अशी जवळपास 115 कोटी रुपयांची मालमत्ता शिल्लक होती तरीही आवताडे यांनी कारखान्यात कोणताही विकास कामे न राबवता तब्बल 200 कोटी चे कर्ज करून ठेवले आहे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी एक लाख 30 हजार पोती साखर परस्पर बाजारात विकली,आम्ही 14 हजार 500 सभासद वाढवले त्यांनी मात्र 19500 सभासद कमी करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही उधळून लावला तरीही त्यांनी अडीच हजार सभासद कमी केले व अडीच हजार नवीन सोयीने सभासद केले आ.आवताडे यांचा कारखान्याच्या 265 एकर जमिनीवर डोळा आहे. आसवानी प्रकल्प पूजनासाठी 80 लाख व कोरोना काळात किट तीन हजार किट वाटून 20 हजार किट वाटल्याचे सांगून 89 लाख हडपले असून त्यानी विकास न करता भ्रष्ट पद्धतीने कारभार केला आहे. शिवानंद पाटील म्हणाले की, यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कारखान्याचे कामकाज चांगले केले परंतु विद्यमान सत्ताधाऱ्यांमुळे सभासद,कामगार, ऊस उत्पादक हे सगळेच अडचणीत आणले, कारखान्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. 28 हजार कारखान्याचे सभासद हेच कारखान्याचे मालक राहतील यासाठी आम्ही सभासदत्व खुले करू,तालुक्यातील कारखानदारी टिकवण्याच्या दृष्टीने सभासदांनी समविचारी पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप म्हणाले की पोटनिवडणुकीपूर्वी 19 हजार 500 सभासदांना नोटीस देण्यात आल्या मात्र पोटनिवडणूकीत मतदार विरोधात जातील या भीतीपोटी त्याचे सभासदत्व कायम ठेवले व इथून पुढे कोणाचे सभासद व जाणार नाही असे आश्वासन दिले होते मात्र दामाजीच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा 2600 चे सभासद कमी केले. बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदर देशमुख म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कोणते आश्वासनाची पूर्ती केली नाही कारखाना कर्जमुक्त करू म्हणणाऱ्यानी कारखान्यावर कोट्यावधी रुपयाचे कर्ज केले. आमच्या पतसंस्थेचे कारखान्याकडे सहा कोटी वीस लाख रुपये कर्ज आहे परंतु सत्ताबदल झाल्यास समविचारी गटाच्या माध्यमातून कारखान्यासाठी 14 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दिले,माजी संचालक पांडुरंग चौगुले म्हणाले की प्रचाराची सभा नसून विजयाची सभा आहे आम्ही संचालक म्हणून काम करत असताना कारखान्याचे कर्ज कमी केले उलट विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधी रुपये कर्ज वाढवून ठेवले.

Pages