दामाजीला 'आवताडे प्रायव्हेट लिमिटेड ' करनाऱ्यांचा डाव हाणून पाडा :- अजित जगताप - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, July 7, 2022

दामाजीला 'आवताडे प्रायव्हेट लिमिटेड ' करनाऱ्यांचा डाव हाणून पाडा :- अजित जगताप

दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ची लढाई ही धनशक्ती विरोधात जनशक्ती असून संस्थापक सभासद असणाऱ्या 19 हजार 500 सभासदांचे सभासदत्व रद्द करून दामाजीला आवताडे प्रायव्हेट लिमिटेड करू पाहणाऱ्या आ.आवताडे यांना सभासद या निवडणुकीत धडा शिकवतील शेतकऱ्यांची देणी,कामगारांच्या पगारी, प्रॉव्हिडंट फंड थकवून मनमानी कारभार करून दामाजी मोडकळीस आणण्याचे पाप आ.आवताडे यांनी केल्याचा आरोप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप यांनी केला आहे.समविचारी पॅनलच्या वतीने भोसे हुनूर, खुपसंगी शिरशी गोनेवाडी आदी, गावातील प्रचार ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले 97 व्या घटना दुरुस्तीच्या आडून 19 हजार 500 सभासदांना वगळण्याचा आ.आवताडे यांचा कुटील डाव शरद पवार व अजितदादाच्या माध्यमातून उधळला त्या सभासदांचा आम्ही हक्क अबाधित ठेवला.शेअर्स अपुरे म्हणून अनेकांना वगळले ११ महिन्याचा पगार कामगारांचा दिला नाही हे महापाप सभासद शेतकरी कामगार विसरला नाही या निवडणुकीत हिशोब चुकता होणार आहे तसेच हुकूमशाही पद्धतीने निवडणुकी अगोदर 2500 हजार सभासदांचा हक्क हरवून घेतला मर्जीतील व नातेवाईक असे नवीन 2500 सभासद त्यांनी केले आवताडे यांची पायाखालची वाळू सरकल्याने प्रशासन व उमेदवारांवर दबाव आणून अर्ज माघारी घ्यावा यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले त्यामुळे निवडणुकीत सभासद त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सभेच्या वेळी दामोदर देशमुख, शिवानंद पाटील,अजित जगताप अँड.नंदकुमार पवार औदुंबर वाडदेकर,दादा गरंडे,अशोक चौंडे, शिवाजीराव नागणे, प्रकाश गायकवाड,अप्पा चोपडे,दादा पवार,भारत पाटील,तानाजी खरात तानाजी काकडे,बसवराज पाटील,पांडुरंग भाकरे, दिगंबर भाकरे,भिवा दोलतडे,आदी उपस्थित होते.

Pages