कर्जमुक्त करू म्हणणाऱ्या आवताडे यांनी कारखान्यावर 200 कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला :- दामोदर देशमुख - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, July 7, 2022

कर्जमुक्त करू म्हणणाऱ्या आवताडे यांनी कारखान्यावर 200 कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला :- दामोदर देशमुख

मंगळवेढा/प्रतिनिधी   श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. वेगवेगळी १९ आश्वासने देवून, लोकांना भूरळ पाडून हे विद्यमान संचालक मंडळ सन २०१६ साली निवडून आले आहे. पण यांनी सभासदांना वाऱ्यावर सोडून दिले आणि पंढरपूर तालुक्यातील ऊस गाळपास आणला त्यामुळे सभासद व कर्मचाऱ्यांवर अन्याय केला साखर कारखाना कर्जात बुडवणाऱ्याला हद्दपार करून कारखाना वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला मतदान करावे असे उद्गार बळीराजा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मा.दामोदर देशमुख यांनी जालिहाल येथील प्रचार सभेत बोलताना केले. देशमुख म्हणाले की आवताडे यांनी गतनिवडणुकीत १९ कलमी वचननामा प्रसिद्ध करून त्यातील एक १० रु किलो साखरेचे वचन सोडून इतर १८ वचने पायदळी तुडवली म्हणजे १८ वचने पाळली नाहीत. १९,५०० सभासदांना नोटीसा पाठवून त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण सरकारच्या धोरणामुळे त्यांचा हा डाव फसला. चेअरमन निवड झाल्यावर यांनी दामाजी कारखाना कर्जमुक्त करणार अशी गर्जना केली, पण कर्जमुक्त सोडाच यांनी १०० कोटीपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर कारखान्यावर करून ठेवला आहे.९०,६७० पोती साखर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला तारण ठेवलेली परस्पर विक्री केली. अपूर्ण शेअर्स आहेत म्हणून २४३७ लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला त्यातील ६८३ लोकांनी पैसे भरून अंतिम मतदार यादीत नाव आणले. आम्ही सर्वांना मतदान मिळावे म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली यांनी कॅव्हेट दाखल करून त्यांना मतदान मिळू नये म्हणून प्रयत्न केला. शेतकऱ्यांची ऊस बिले कधी ४ महिन्यांनी तर कधी ८ महिन्यांनी देतात. आवताडे यांनी आपल्याच तालुक्यातील फॅबटेक शुगर (नंदुर-बालाजीनगर) चालवितो म्हणून तेथे गेले आणि तो साखर कारखाना दीड वर्षात बंद पाडून दाखवला.असा यांचा कारभार आहे. यांना जर सभासदांनी पुन्हा निवडून दिले तर ते १-२ वर्षात हा कारखाना बंद पाडतील आणि २५ ते ३० वर्षाच्या भाडेकराराने वर्षाला ७५ लाख रुपये भाडे आहे ते भरून स्वतःच चालवायला घेतील त्यावेळी शेतकऱ्यांची काय अवस्था होईल याचा आपण सभासदांनी गांभीर्याने विचार करावा.
यांनी एकदा भाडेकराराने चालविण्यास घेतल्यास तुमचा मतदानाचा अधिकार राहणार नाही. तूमची शेअर्सची रक्कम बुडणार आहे. तुमचे ऊस बिलातून कपात केलेली ६.२० कोटीची ठेव बुडणार आहे. कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम, ग्रॅज्युएटी मिळणार नाही आणि साखर कारखान्याचे पुन्हा इलेक्शन होणार नाही. हे सगळे टाळावयाचे असेल तर सत्ताधारी विद्यमान चेअरमनच्या पॅनेलचा पराभव करून, दामाजी साखर कारखाना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या समविचारी शेतकरी आघाडीला मतदान करून दामाजी साखर कारखाना वाचवू या असे आवाहन शेवटी देशमुख यांनी केले.

Pages