सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा वर्षात सभासद कामगारांचे हित जोपासण्यापेक्षा स्वतःचे खिसे भरले :- राजाराम जगताप - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, July 6, 2022

सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा वर्षात सभासद कामगारांचे हित जोपासण्यापेक्षा स्वतःचे खिसे भरले :- राजाराम जगताप

समविचारी पॅनलच्या प्रचार सभेत आ.आवताडे गटावर सडकून टीका... दिव्य न्यूज नेटवर्क मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची लक्ष्मी असणाऱ्या दामाजी कारखान्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना व कामगारांना कोणतेही आर्थिक मदत न करता स्वतःचे उखळ पांढरे केले कारखान्याच्या इस्टेटिपेक्षा जादा कर्जाचा बोजा करून शेतकरी कामगारांना देशोधडीला लावले असल्याची सडकून टीका माजी सभापती राजाराम जगताप यांनी केली.समविचारी पॅनलच्या वतीने मरवडे या गावात प्रचार सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदर देशमुख,अँड.नंदकुमार पवार,प्रकाश गायकवाड,शिवानंद पाटील,नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप प्रा.पी.बी पाटील,शशिकांत बुगडे ,इंनुस शेख,नंदकुमार हावनाळे,औदुंबर वाडदेकर, तानाजी काकडे,बसवराज पाटील,दादा दोलतोडे,गौडाप्पा बिराजदार,दौलतराव माने,यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. दामाजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष (स्व) किसनलाल रामचंद्र मर्दा वकील यांनी आपल्या कार्यकाळात चांगला कारखाना चालविला सभासद व कामगारांच्या सुख दुःखात मदतीचा हात दिला. चरणुकाकानी सभासदाच्या अडचणीला धावून जात ऊस लागवडीसाठी एकरी दहा हजाराची मदत करून शेतकऱ्यांचे हित जोपासले. आजपर्यंतच्या संचालक मंडळाला कोणताही सभासद , कामगार कारखान्यावर जाऊन हक्काने जाब विचारू शकत होता मात्र गेल्या सहा वर्षात अख्या तालुक्याने सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार पहिला युवा उद्योगपती कारखाण्याचा विकास करेल असे वाटले होते मात्र ज्या सभासदांनी त्यांना मतदान केले त्याला कारभार बघून पश्चातापाची वेळ आली . सध्या समविचारी आघाडीने दिलेले उमेदवार हे शेतकऱ्यांचा हित जोपासतील असा विश्वास आहे.स्व.भारतनानांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.शिवाजीराव काळुंगे अँड.नंदकुमार पवार यांच्या कार्यकाळात ऊसाला चांगली रिकवरी मिळून साखर उत्पादन जास्त केले व सभासद शेतकऱ्यांनाही चांगल्या पद्धतीने दर दिला शेतकऱ्यांना घामाचा दाम दिला कामगारांना त्याचा कष्टाचा पगार दिला . सभासद शेतकऱ्यांना कामगारांना सन्मानाची वागणूक दिली.
सत्ताधाऱ्यांनी मात्र सहा वर्षात खाजगी कारखाना आसल्याप्रमाणे कोणाचाही विचार न करता आपल्या मनमर्जीने कारखाना चालविला सभासद शेतकरी जागरूक आहे त्याला कारखान्यातील भ्रष्टाचारी कारभाराची इथंभूत माहिती झाली आहे मात्र तो निवडणुकीची वाट पहात होता ती वेळ आली आली आहे ही शेवटची संधी आहे.कोणाच्याही दादागिरीला न जुमानता स्वाभिमानी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना मतपेटीतून धडा शिकवावा असे त्यांनी सांगितले

Pages