सभासद शेतकऱ्यांच्या पाठबळावर समविचारी पॅनलचा ऐतिहासिक विजय :- शिवानंद पाटील - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, July 12, 2022

सभासद शेतकऱ्यांच्या पाठबळावर समविचारी पॅनलचा ऐतिहासिक विजय :- शिवानंद पाटील

सहा वर्षात झालेला छळ सभासद शेतकरी मतपेटीतून करतायेत व्यक्त..... मंगळवेढा/प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांनी सभासद शेतकऱ्यांना,कामगारांना दिलेली हिनपणाची वागणूक,ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची झालेली हेळसांड,१९ हजार ५०० सभासद वगळण्यासाठी रचलेला डाव या मुद्द्यावर सभासद शेतकऱ्यांचा असलेला संताप व आक्रोश सभासद मतपेटीतून व्यक्त करीत आहे.सभासद शेतकऱ्यांचा विश्वास हेच समविचारी पॅनलचे पाठबळ आहे या पाठबळावर दामाजीच्या आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त मताधिक्य मिळनार असल्याचा ठाम विश्वास समविचारी पॅनलचे उमेदवार व झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केला ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गटात मतदान केंद्रास भेटी देण्यास आले असता त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला.शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करण्याची संधी द्या अशा आवाहनाला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे मतदानाच्या टक्के वरून दिसत आहे
मंगळवेढा तालुक्यातील सहकारी तत्वावरील दामाजी कारखाना हे एक शेतकऱ्यांचे विकासाचे साधन आहे या शेतकऱ्यांच्या राजवड्याला सताधार्यांनी कामगार व शेतकरी यांना दिलेल्या त्रासाची जाणीव ठेवत कारखाना वाचविण्याच्या भूमिकेतुन तयार झालेल्या समविचारी पॅनलला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या सहकार्यामुळे सत्तान्तर होणार असून शेतकरी व कामगार यांना निश्चित चांगले दिवस येणार आहेत असे ही पाटील यांनी सांगितले दामाजी रुपी हे शेतकऱ्यांचे मंदिर शेतकऱ्यांच्या ताब्यात रहावे यासाठी समविचारी पॅनलच्या माध्यमातून जो लढा उभारला त्यास मतदार भरभरून साथ देत आहे शेतकऱ्यांत निर्माण झालेली जारूकतेने जवळपास दोन हजारांनी विजय होईप असा दावा शिवामद पाटील यांनी व्यक्त केला.

Pages