मंगळवेढ्यात अवैध वाळू वसुलदार पोलिसाचा प्रताप,राष्ट्रवादी च्या पदअधिकाऱ्यास मारहाण.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, June 21, 2022

मंगळवेढ्यात अवैध वाळू वसुलदार पोलिसाचा प्रताप,राष्ट्रवादी च्या पदअधिकाऱ्यास मारहाण....

मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची वसुली करण्यारया हेबाडे नामक पोलिसाने येथील राष्ट्रवादीच्या तालुका वक्ता प्रशिक्षण सेलचे अध्यक्ष शिवाजी काळे यांना विनाकारण मारहाण केली असून संबंधित वसूलदार पोलीस हेबाडे याच्यावर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण सेलचे तालुका अध्यक्ष शिवाजी काळे यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दि.15 रोजी रात्री 12 च्या सुमारास चडचण येथील नातेवाईकाकडून काळे हे सोड्डी मार्गे येड्रावला येत असताना सोडी फाट्यांवरती पोलीसांची नाकाबंदी सुरु होती,त्या ठिकाणी वाहतूक खोळांबली होती म्हणून पुढे जाऊन बघीतले असता नाकाबंदीसाठी असलेले मंगळवेढा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल काळेल यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा वाळूचा टिपर थांबून चालकास वाळू वाहतूकीचा परवाना विचारत होते त्यावेळी सदर चालकाने मंगळवेढा पोलीस स्टेशनचे (वसुलदार) दयानंद हेंबाडे साहेब यांची गाडी असून या गाडीला कधीच कोण पावती कोण विचारत नाही आणि तुम्ही कशी काय विचारता,ह्या गाडीची सर्व देखरेख मी करतोय असे चालकाने सांगितले तेव्हा काळेल यांनी हेंबाडे यांना फोन लावला तेव्हा हेंबाडे यांनी आपली गाडी आहे गाडी सोडा असे सांगितले त्यावेळी काळेल यांनी गाडी सोडण्यास नकार दिल्यानंतर काही वेळात स्विफ्ट डिझायर एम.एच.13.6423 मधून टिपर मालक हेंबाडे व खाजगी इसम आनंदा मोरे व दोन अनोळखी व्यक्ती तिथे आल्यानंतर मला कोणतीही विचारणा न करता बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा पोलीस काळेल यांनी तुमच्या गाडीला परवाना नाही म्हणून मी गाडी अडवून ठेवली आहे
त्यांचा काही संबंध नाही परंतु त्यांचे ही न ऐकता मला त्यांनी मारहाण चालूच ठेवली व त्याठिकाणाहून सदरचा टिपर पळवून घेऊन गेले याची माहिती पोलीस अधिक्षक सातपूते यांना दिल्यानंतर पो.नी.माने यांनी उलट काळे यांनाच फोन करून मी येतो तुम्ही ते वाहन धरुन ठेवा असे सांगितल्याने मित्रांच्या सहकार्याने टिपर पकडला माने साहेब यांच्याकडे सोपविला त्यावेळी टिपरवरती व मारहाण करणाऱ्या वरती कारवाई करतो असे सांगितले परंतु माने यांनी कोणतीही कारवाई न करता तो सोडून दिला व ज्यांना वाळू खाली केली त्यांना सातारा येथील वाळू लीलावाची पावती देतो असे सांगत टिपर घेवून गेले. याबाबत पो.नी.माने यांच्याकडून कारवाई बाबतउडवाउडवीची उत्तरे दिली जात असून टिपर व मारहाण करणाऱ्या वसुलदार दयानंद हेंबाडे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही हेंबाडे यांचे विरुध्द तालुक्यातील अनेक नागरीकांनी तक्रार करुन ही मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने यांचे वसुलदार असल्याने माने त्यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी अशी लेखी तक्रार काळे यांनी गृहमंत्री यांच्याकडे केली आहे राज्यात पोलीसांचे वसुली प्रकरण गाजत असताना मंगळवेढा येथे खुद्द सत्तेतील राष्ट्रवाडीच्या पदाधिकार्याला अवैध वाळूची वाहतुकीला अभय देणाऱ्या पोलिसांकडून झालेली मारहाण विचार करायला लावणारी आहे.
मंगळवेढा पोलिसांकडून अवैध व्यवसायिकांना पाठीशी घातले जात असून माझा काहीही सम्बध नसताना मारहाण केली आहे माझ्याकडे या घटनेचे फोटो व व्हिडीओ आहे हेबाडे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. शिवाजीराव काळे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण सेल
काळे यांची तक्रार चुकीची असून जाणूनबुजून त्रास देण्याच्या हेतूने तक्रार केली आहे या तक्रारी संदर्भात वरिष्ठांनी जाब जबाब घेने सुरू आहेत. दयानंद हेबाडे पोलीस कर्मचारी मंगळवेढा
सदरील टिप्पर कारवाई करून पोलिस स्टेशन समोर आणून लावला आहे त्याबाबत महसूल विभागाला कळवले आहे संबंधित तक्रारदाराची तक्रार ही चुकीचे आहे पोलीस निरीक्षक मंगळवेढा रणजीत माने

Pages