मंगळवेढ्यात बाराशे रूपयाची लाच स्विकारताना पुरवठा निरीक्षकासह संगणक चालक लाचलुचपत'च्या जाळ्यात.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, May 27, 2022

मंगळवेढ्यात बाराशे रूपयाची लाच स्विकारताना पुरवठा निरीक्षकासह संगणक चालक लाचलुचपत'च्या जाळ्यात....

मंगळवेढा/ प्रतिनिधी मंगळवेढा येथील शासकीय धान्य गोडाऊन मध्ये मासिक धान्याचे चलन रक्कम भरण्यासाठी स्वतःकरिता २५० व साहेबांसाठी १२०० रुपये असा मासिक हप्ता द्यावा लागेल असे म्हणून बाराशे रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षक उत्तम वामन गायकवाड व खाजगी इसम संगणक चालक बालाजी सिद्धेश्वर यादव वय 25 या दोघांना साेलापुर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.दरम्यान या कारवाईने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे यातील तक्रारदार यांचे वडर गल्ली, मंगळवेढा येथे स्वस्त धान्य दुकान असून त्यांना प्रत्येक महिन्याला धान्याच्या चलनाची रक्कम तहसिल कार्यालय अंतर्गत असलेल्या शासकिय धान्य गोदाम येथे रक्कम चलनाव्दारे भरावी लागते. तक्रारदार यांनी माहे मे २०२२ या महिन्याचे मासीक चलन भरण्याच्या अनुषंगाने शासकिय धान्य गोदाम येथील आरोपी बालाजी यादव यांना भेटले असता आरोपी यादव यांनी तक्रारदार यास चलनाचे रक्कमे व्यतिरिक्त त्याचे स्वत: करीता २५०/- व साहेबांचे करीता १२००/-रु अशी मासिक हप्ता म्हणून दयावी लागेल असे म्हणून लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १२/०५/२०२२. दि २६/०५/२०२२ दरम्यान आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली असता पडताळणी कारवाई करून आरोपी यादव यांनी वरील प्रमाणे लाच रकमेची मागणी केली दि. २६/०५/२०२२ रोजी यातील आरोपी गायकवाड यांचेवर पडताळणी कारवाई केली असता पडताळणी कारवाईदरम्यान त्यानी आरोपी यादव यांनी मागणी लाच रक्कमेची मागणी करून ती रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश गुरव पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक संजीव पाटील सोलापूर पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस नाईक घाडगे पोलीस शिपाई मुल्ला चालक सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली रात्री उशिरा वरील दोघा आरोपीविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दाेघांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Pages