"त्या "वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त? - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, March 8, 2022

"त्या "वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त?

मंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे "वराती मागून घोडे"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील सिद्धनाथ मंगल कार्यालय व खडीक्रशरच्या जागेबाबत बिगर शेती आदेश व नगररचना साहित्यरचना सोलापूर यांचेकडील अंतिम रेखांकन पारित झाले नसल्याचा अहवाल पाठखळच्या मंडलाधिकाय्रांनी नुकताच तहसीलदार यांना सादर केला. सदरचे मंगल कार्यालय व खडीक्रेशर हे अवैधरित्या सुरू असून यामध्ये शासनाचे मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याची तक्रार येथील नागरिक पोपट इंगोले यांनी केली होती .त्याचबरोबर अॅड. रमेश जोशी यांनी देखील या अनुषंगाने मा.महसूलमंत्री याचे पत्राच्या पत्र क्र.मस.मंत्री.महसूल/जनरल 7917/21 दि.23/2021 व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती या तक्रार अर्जाची पाटकळ च्या मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. व त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गट नंबर 258/1 चा एक हा अंजली भिमराव मोरे यांचे नावे असून सदर गटामध्ये त्यांनी 0.20 क्षेत्रामध्ये सिद्धनाथ मंगल कार्यालय पत्रा शेडचे बांधकाम केले आहे.
सदरचे बांधकाम करताना त्यांनी ग्रामपंचायत पाटखळ यांच्याकडून बांधकाम परवाना दाखला घेतला आहे परंतु सिद्धनाथ मंगल कार्यालय पाटकळ यास यांनी बिगर शेती परवानगी दिलेली नाही परंतु जबाबामध्ये त्यांनी अनाधिकृत सारा व दंड भरण्यास तयार असल्याबाबत म्हटले आहे तसेच येथील गट नंबर 392 मध्ये अभिजात भीमराव मोरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे ना-हरकत व 30/11/2022 पर्यंत असल्याचे दिसून येते स्वामित्व धनाचे पावती व अनधिकृत भरलेली पावती जोडली आहे.परंतु नगर साय्यक रचना सोलापूर यांनी सदरील खडीक्रेशर औद्योगिक प्रयोजनासाठी बिगर शेती करता येत नसल्याचे व महा-मार्ग क्र.65 नजीक असल्यामुळे बिगरशेती होत नसल्याबाबत लेखी स्वरूपात पत्र दिले आहे व सिद्धनाथ मंगल कार्यालय पाटकळ व स्टोन क्रेशर बाबत समक्ष अधिकाऱ्यांचे यांनी त्यांचे बिगरशेती आदेश व नगर सहाय्यक रचना सोलापूर यांचेकडील अंतिम रेखांकन पारित झालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी तहसीलदार स्वप्निल रावडे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी दिव्या वर्मा मॅडम यांनी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांना कारवाई करण्या संदर्भात पत्र पाठवले असता कारवाई करणे गरजेचे असताना संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची गरज वाटत नव्हती कारण नगर साय्यक रचना सोलापूर यांनी सदरील खडीक्रेशर प्रयोजनासाठी जागा उपयुक्त नसल्याबाबत लेखी पत्र दिले असून वारंवार महसूल विभागा पाठीशी घालत आहे असे दिसून येते तरी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. अॅड.रमेश जोशी

Pages