महाशिवरात्रीनिमीत्त तिर्थक्षेत्र माचणूर येथे श्री.सिध्देश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासुन रिघ... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, March 2, 2022

महाशिवरात्रीनिमीत्त तिर्थक्षेत्र माचणूर येथे श्री.सिध्देश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासुन रिघ...

दिव्य न्यूज नेटवर्क तिर्थ क्षेत्र माचणुर येथे महाशिवरात्रीनिमित्त हजाराे भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासुन हर... हर.. महादेव ..च्या जयघोषात गर्दी केली होती. दरम्यान गतवर्षी कोराेनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचे आदेश शासनाने केल्याने इच्छा आसुनही भाविकांना दर्शन घेता आले नाही. मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदी काठावर माचणूर येथे कडेकपारीत मंगऴवेढ्या पासून 14 कि.मी. व सोलापूर पासून 40 कि.मी अंतरावर महादेवाचे पुरातन कालीन हेमाडपंती भलेमोठे मंदिर आहे.महाशिवरात्रीला येथे पाच दिवस प्रतिवर्षी यात्रा भरते.काेराेनामुळे गत वर्षी यात्रा भरू शकली नाही.कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,येथील भाविक महाशिवरात्रीनिमित्त भगवान श्री शंकरा च्या दर्शनासाठी प्रतिवर्षी येत असतात.यंदा काेरानाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने दर्शनासाठी मंदिर खुले केल्यामुळे भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.पुरूष भाविकापेक्षा महिलांची संख्या दर्शनासाठी आधिक हाेती.महिलांच्या तिन लांब रांगा लागल्याचे चित्र हाेते.पहाटे महादेवाच्या पिंडीला रुद्राभिषेक घातल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.दिवसभर सूर्योदय ते सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात पाच दिवस यात्रा भरते.काेराेनाच्या प्रभावामुळे तुरळक प्रमाणात व्यापारी मेवामिठाई,जनरल स्टोअर्स ,रसपाण गृहे, आले आहेत,सायंकाळी गावातून फटाक्यांची आतषबाजी करीत श्री .च्या पालखीचे आगमन मंदिरा कडे झाले.पाच दिवसाच्या मुक्कामानंतर पाचवी दिवशी पुन्हा श्री.ची पालखी माचणूर गावाकडे जानार आहे. पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी महाशिवरात्री निमीत्त मोठा पाेलीस बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये १ पालीस निरीक्षक. ३ सहाय्यक पाेलीस निरीक्षक,४० पाेलीस,७ महिला पाेलीस व १ स्टाँकींग फाेर्स नेमला आहे.सद्या एस.टी.कर्मचार्यांचा संप आसल्याने भाविक खाजगी वाहाने व माेटर सायकलवर माेठ्या प्रमाणात आले हाेते. आगाराने केवळ एक बस साेडली हाेती. वाहानांच्या गर्दीमुळे वाहातुक पाेलीसांची दमछाक झाली.

Pages