मावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, February 7, 2022

मावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...

 


जन्मठेपेच्या  शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ....!


मंगळवेढा/प्रतिनिधी


           मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन पोलिस नाईक दत्तात्रय भोसले याने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला मावस भाऊ  नितीन यादव (रा.वायफळ ता.जत)  या भाविकाचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याला दोषी धरून अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान या शिक्षेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

            यातील आरोपी पोलिस नाईक दत्तात्रय भोसले(रा.सोनंद ता. सांगोला) हा मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना दि.5 जुलै 2017 रोजी यातील मयत नितीन यादव  हा जत हून  पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी आला होता. देवदर्शन करून दिंडीतून परत गावाकडे जात असताना भोसले याने नितीनला थांबवून आपण बाहेर जेवायला जावू अशी बतावणी करून त्याला थांबवून ठेवले. या दोघांची भेट झाल्यावर एका पोलिस अधिकार्‍याची आरोपीने कारगाडी घेवून त्यामध्ये त्या मयतास  बसवून त्याचा खून करून नगर जिल्हयातील कर्जत हद्दीत एका रस्त्याच्या कडेला ओढयात प्रेत फेकून दिले हाेते.जनावरे राखनार्या ऐकाच्या  नजरेस ते आल्याने कर्जत पोलिसांनी आज्ञात मृतदेह मिळून आल्याची  नोंद तेथील पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

             मयत नितीन यादव घरी न पोहोचल्याने व त्याचा माेबाईल लागत नसल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला या दरम्यान कर्जत हद्दित ऐक बेवारस प्रेत तेथिल पाेलीसांना मिळून आले हाेते  याबाबत चौकशी सुरु आसताना मयत जत भागातील माहीती मिळाली मयताचा माेबाईल आराेपीने काढून ताे मंगळवेढ्यात पाेलीस लाईनमधील घरी ठेवला हाेता घटनेनंतर ताे माेबाईल चालु करताच पाेलीसांना लाेकेशनवरून आराेपी मंगळवेढ्यातील आसावा आसावा आसा संशय आल्याने तपासीक पाेलीस पथक मंगळवेढ्यात दाखल झाले व सुतावरून स्वर्ग गाठत कर्जत पाेलीसांनी  खूनाच्या घटनेचा फर्दापाश केला.

             पोलिसांनी त्यास अटक करून चौकशीसाठी  मंगळवेढा पोलिस ठाण्यालगत असलेल्या पोलिस लाईन निवासस्थानात आणून घराची झडती घेतली असता चोरीचे पिस्तूल मिळून आले होते. आराेपी भाेसले हा गार्डड्यूटीवर आसताना सुरक्षेच्या कारनावरून निवडणूक दरम्यान परवाना धारक नागरीकांची ठेवलेले  पिस्तुल चाेरल्याचेही  चाैकशीत निषपन्न झाल्याने दाेन पिस्तुल पाेलीसांनी जप्त केली.या पिस्तुल चाेरीच्या घटनेमुळे गार्डवर सेवा बजावनार्या ३१ पाेलीसांची चाैकशी सुरूआसताना हा चाेरीचा प्रकार उघड झाला व त्यांनी सुटकेचा श्वास साेडला. याचवेळी मयत नितीनचा मोबाईलही भोसलेच्या घरी मिळून आला होता.

              तपास अधिकार्‍यांनी तो जप्त केला. गुन्हयात वापरलेली कारगाडीही पोलिसांनी जप्त केली. व गुन्हयाची कबुली देत मृतदेह टाकल्याची जागा आरोपीने दाखविली होती. . अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी धरून जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान,आरोपी हा मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याने या खून प्रकरणाचा निकाल घोषित होताच साेलापुर जिल्हाच्या  पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Pages