दाेन मुली मृत्यू प्रकरणी आरोपीला पाठीशी घालणाऱ्या निषक्रिय पोलीस निरीक्षकाची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबीत करावे,आंदाेलन दरम्यान जनहित शेतकरी संघटनेचे,प्रभाकर देशमुख यांची मागणी...। - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, January 4, 2022

दाेन मुली मृत्यू प्रकरणी आरोपीला पाठीशी घालणाऱ्या निषक्रिय पोलीस निरीक्षकाची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबीत करावे,आंदाेलन दरम्यान जनहित शेतकरी संघटनेचे,प्रभाकर देशमुख यांची मागणी...।

 मंगळवेढा /प्रतिनिधी 


             मरवडे येथील दोन चिमुकल्या मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला,या मृत्यूस कारणीभूत असलेले आरोपी तब्बल दहा दिवसाचा कालावधी उलटूनही आद्याप   ते मोकाट आहेत, याला पुर्णता जबाबदार मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हेच जबादार आसल्याचा आराेप करीत यांच्या काळात अनेक गुन्हे आर्थिक तडजोडीतून दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आम्ही ऐकतोय,अशा भ्रष्ट व बेजबाबदार पोलीस निरीक्षकाची खातेनिहाय चौकशी व्हावी,त्यांना निलंबित करावे,अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी आज मरवडे येथे रास्ताराेका प्रसंगी केली आहे.

            मरवडे येथे आज सकाळी दहा वाजता  शेकडाे नागरिक व महिलांच्या उपस्थितीत चव्हाण कुटुंबातील त्या दोन मयत मुलींना न्याय मिळावा, मोकाट आरोपींना तात्काळ अटक व्हावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,यावेळी ते आंदाेलकापुढे ते बाेलत हाेते.या आंदोलनात मरवडे गावातील सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी करून आपला संतापजनक आक्रोश महिला व पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला,याप्रसंगी राष्ट्रवादीचे लतीफभाई तांबोळी,माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर,प्रहारचे संतोष पवार,माणिक पवार,शेतकरी संघटनेचे  दत्तात्रय गणपाटील,यांच्यासह आदींनी या मुलींना न्याय मिळावा,वेळ मारूपना करणाऱ्या पोलिस प्रशासनाविरोधात आपली निराशजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले.

               मंगळवेढा तालुक्यात अनेक गुन्हे वाढत आहेत,तिन दराेडे व दराेड्यातुन खून आशा समाजविघातक घटना घडूनही पाेलिस निरीक्षक गूंजवटे बेफिकीर बेजबाबदार वागत आहेत.दाेन वर्षात ऐकाही चाेरीचा तपास नाही.कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकार्‍यामुळे मंगळवेढा पोलीस खाते बदनाम होत आहे,अनेक गुन्हे अर्थीक तडजोडीतून मिटवले जात आहेत त्यामुळे सामाजिक व्यवस्था बिघडत चाललीली आहे आशा बेफिकीर आधिकार्यावर कारवाई हाेणे गरजेचे आसल्याचे ते म्हणाले.त्या बेजबाबदार आधिकार्याची खातेनिहाय चाैकशी करून त्यांना निलंबित करावे आशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी रास्ताराेकाे प्रसंगी करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास तिव्र आंदाेलन छेडन्याचा इषारा दिला.चव्हाण कुटुंबावर अन्याय होतोय,यावर कोण बोलणार,जनतेचे आमदार लक्षवेधी करून चव्हाण कुटुंबाला न्याय द्यायला हवा होता, त्यांना आर्थिक मदत मिळावी, लवकरात लवकर संबंधित आरोपीला अटक करून कर्तव्यात कसूर करणारे अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी व्हावी, त्यांचे निलंबन व्हावे,अशी मागणी देशमुख यांनी करताच मरवडेकरांनी  घाेषणा देत  पाेलीस निरीक्षकाला निलंबित करा आसा एकच सुर धरला.या आंदाेलन प्रसंगी मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे म्हणाले मरवडे गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेत आता दिरंगाई होऊ नये आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबासोबत आहोत लवकरात लवकर आरोपींना अटक करून या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली तसेच युवराज घुले यांनीही चव्हाण कुटुंबाविषयी झालेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारला तपास कामात दिरंगाईमुळे उलट सुलट चर्चा होत आहेत,याची खबरदारी घेऊन पारदर्शक तपास व्हावा अन्यथा सर्वसामान्य जनता होणारा अन्याय सहन करणार नाही.

               पोलिसांनी येत्या चार दिवसात आरोपी गजाआड नाही केल्यास तालुका बंद ठेवून जनआंदोलन करू असा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.यावेळी उपस्थित जनसमुदाया समोर डी.वाय.एस.पी.पाटील यांनी आश्वासन देऊन तपास कामात मी स्वतः लक्ष देऊन चव्हाण कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वास दिले.मरवडे येथील भक्ती व पूनम चव्हाण या दोन लहान बहिणीचा बासुंदी श्रीखंड पनीर आणि रबडी या दुग्धजन्य पदार्थांतून झालेल्या विषबाधेमुळे दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला तरीही आंदोलन करून न्याय मागण्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.या प्रकरणात अन्नभेसळ खात्याने सतीश कौडूभैरी व आकाश फुगारे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु अद्याप या आरोपीला अटक केली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नामदेव गायकवाड,सुरेश पवार गुरुजी,सरपंच नितीन घुले,दादासाहेब पवार,अजित पवार,दत्तात्रय गणपाटील,धन्यकुमार पाटील,शिवाजी पवार,माणिक पवार, सुभाष भुसे,दत्ता मासाळ, राजाराम पोतदार,संभाजी रोंगे, अंबादास पवार,राजाराम कालीबाग,प्रकाश सूर्यवंशी,हैदर केंगार,रतीलाल केंगार,श्रीकांत गणपाटील, राहुल शिंदे,सतीश शिंदे,सिद्धेश्वर सूर्यवंशी, विजय पवार,शिवाजी केंगार,विकास दुधाळ,सुदर्शन रोंगे,दुशासन दुधाळ, सतीश शिंदे, संजय पवार,समाधान ऐवळे,गणेश पाटील, बालाजी पवार, दादासाहेब रोंगे, किसन रोंगे, रघुनाथ चव्‍हाण, राजाराम कोळी, अल्लाबक्ष इनामदार,युवराज सुर्यवंशी, अशोक जाधव, सचिन घुले, अतुल पवार, निलेश स्वामी, गणपत पवार, दत्ता शिवशरण,परशु केंगार,प्रकाश पारसे,आदी यांच्यासह ग्रामस्थ माेठ्या संखेने उपस्थित होते.

            मरवडे येथिल दाेन मुली मृत्यू प्रकरणी मी स्व.ता तपास करून आराेपीस आटक केली जाईल राजश्री पाटील, डी.वाय.एस.पी.मंगऴवेढा

Pages