महिलांचे प्रश्न साेडवन्यासाठी मंगळवेढा पोलिस ठाण्यात महिला पोलिस अधिकारी नेमण्याची होतेय मागणी... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, January 2, 2022

महिलांचे प्रश्न साेडवन्यासाठी मंगळवेढा पोलिस ठाण्यात महिला पोलिस अधिकारी नेमण्याची होतेय मागणी...

 

दिव्य न्यूज नेटवर्क

           मंगळवेढा पोलिस ठाण्यात सात पुरुष पोलिस अधिकारी असताना एकही महिला पोलिस अधिकारी नसल्यामुळे महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत.दरम्यान जिल्हा महिला पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणी गांभिर्यपूर्वक लक्ष घालून मंगळवेढयात महिला अधिकारी नेमून महिलांना योग्य न्याय दयावा अशी मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे.

              मंगळवेढा पोलिस ठाण्यात एक पोलिस निरिक्षक,चार सहाय्यक पोलिस निरिक्षक,दोन पोलिस उपनिरिक्षक असे सात पोलिस अधिकारी सध्या कार्यरत  आहेत.येथील महिला पोलिस उपनिरिक्षक प्रणोती यादव यांची बदली मागील काही महिन्यापुर्वी झाली आहे. शासन महिलांना सर्वच क्षेत्रात 50 टक्के आरक्षण देवून त्यांना सक्षम बनवत असताना येथे मात्र सात पुरुष अधिकारी कार्यरत असून एकही महिला अधिकारी नसल्यामुळे येथील तक्रार घेवून येणार्‍या महिलांचे नाजूक प्रश्‍न सुटण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. 

             यापुर्वीही तत्कालीन दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या मंगळवेढा भेटीप्रसंगी पोलिस ठाण्यात महिला पोलिस अधिकारी नसल्याने महिलांचे प्रश्‍न सोडविण्यात ऐशी तैशी सुरु असल्याची तक्रार केल्यानंतर तात्काळ त्यांनी महिला सहाय्यक पोलिस निरिक्षक सरोजीनी चव्हाण यांना नेमून  मंगळवेढयाच्या महिलांना न्याय दिला होता.नंतर व्दितीय अधिकारी म्हणून प्रणोती यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या कॉलेज सुरु असल्याने ग्रामीण भागातून मुलींची शहरात येण्याची संख्या मोठी आहे. यादव यांच्याकडे दामिनी पथकाचा कार्यभार होता. त्यांच्या बदलीनंतर या पथकाचे कामकाज थंड असल्याने नवीन महिला अधिकारी नेमून हे पथक कार्यरत करावे अशी मागणी पुढे येत आहे.

          मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे पोलिस हवालदार महिबूब शेख(पंढरपूर शहर),प्रमोद मोरे(पंढरपूर शहर),महिला पोलिस सुवर्णा मोरे(पंढरपूर ग्रामीण),पोलिस शिपाई वैभव घायाळ(पुणे) येथून आले आहेत.येथील एकूण पोलिस कर्मचार्‍यांची संख्या आता 65 वर पोहोचल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.

Pages