धनश्री'ने हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविले :- तानाजी काकडे - Divyaprabhat News

Breaking News

Monday, January 24, 2022

धनश्री'ने हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविले :- तानाजी काकडे


दिव्य न्यूज नेटवर्क 


            सहकारातून सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी प्रा.शिवाजीराव काळूगें यांनी धनश्री परिवारासाठी जो गुरुमंत्र दिला आहे, तो जोपासून  कोरोनासारख्या संकट काळातही धनश्री महिला पतसंस्थेने व धनश्री मल्टीस्टेटने ठेवीदार, कर्जदार व खातेदारांचे हित जोपासत त्यांना तत्पर सेवा देत जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविले असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीराव काकडे यांनी केले.धनश्री मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनपदी प्रा शिवाजीराव काळूगें यांची निवड झाल्याबद्दल के .पी.सर्व्हिसेसच्या वतीने प्रा काळूगें यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

           धनश्री पतसंस्था व मल्टिस्टेट या दोन्ही संस्थेची एक हजार कोटीकडे घोडदौड सुरु आहे जिल्ह्यातील नामांकित मल्टिस्टेट बँक म्हणून अल्पावधीतच नावारूपास आली आहे.सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी बँकेचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध व प्रा शिवाजीराव काळूगें यांची दूरदृष्टी या विकासात्मक वाटचालीला कारणीभूत असल्याचे दामाजी शुगरचे माजी संचालक बसवराज पाटील यांनी सांगितले. यावेळी सूर्योदय परिवाराचे अनिल इंगोले, दादा दोलतोडे धनाजी खडतरे आदी उपस्थित होते. 

    प्रा.शिवाजीराव काळूगें यांच्या सत्कार प्रसंगी तानाजीराव काकडे, बसवराज पाटील, अनिल इंगोले, दादा दोलतोडे , धनाजी खडतरे


 

Pages