माजी शिक्षणाधिकार्‍यांनी १८३ जि.प.शाळांना दिले ७ लाखाचे सूचना फलक... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 22, 2022

माजी शिक्षणाधिकार्‍यांनी १८३ जि.प.शाळांना दिले ७ लाखाचे सूचना फलक...


दिव्य न्यूज नेटवर्क 

          मंगळवेढा तालुक्याचे माजी शिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर आठवण ज्वलंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १८३ शाळांना ७  लाख रुपये किमतीचे ७७९  सूचना फलकाचे वाटप करण्यात आले आहे.तत्कालीन गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील हे मूळचे सांगली जिल्हयातील असून ते सन 1919/2000 मध्ये मंगळवेढा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. 31 मे रोजी ते सेवानिवृत्त झाले असून मंगळवेढयात केलेल्या कामाची आठवण म्हणून त्यांनी तालुक्यातील 183 जि.प.शाळांना 7 लाख रुपयांचे सूचना फलक वाटप केले आहेत. 

जि.प.पाटखळ शाळेला फलक देताना गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,माजी सभापती प्रदिप खांडेकर,गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे,व शिक्षक छायाचित्रात दिसत आहेत.

             या फलकाचा प्रत्येक शाळेला विदयार्थ्यासाठी सूचना व सुविचार,विविध कला गुणांचे प्रदर्शन मांडण्यासाठी या फलकाचा उपयोग होणार आहे. पाटील यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून याबाबतची माहिती सर्व फलक मंगळवेढा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्त केले आहेत. गेली दोन वर्षे नैसर्गिक कोरोना या संसर्ग साथीचे संकट सर्व जगावर आल्याने आर्थिक बाजू कमकुवत होत असताना या सेवानिवृत्त अधिकार्‍याने जिल्हा परिषद शाळांना 7 लाखाच्या साहित्याची भेट देवून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
Pages