पाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, January 27, 2022

पाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....

 

 मंगळवेढा/प्रतिनिधी


           मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल्लंघन  करणारे असून तत्कालीन प्रांताधिकारी बंद केले असताना केवळ राजकीय वरदहस्त आर्थिक तडजोडीतून ते पुन्हा सुरू असून याची  चौकशी करून बेकायदेशीर असल्याने चौकशी ते कायमस्वरूपी बंद करून दंड वसूल करण्याची मागणी मंगळवेढा येथील अँड. रमेश जोशी महसूल मंत्र्याकडे केली आहे. 

             या पत्राची दखल घेत सोलापूर जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी दिव्या वर्मा मॅडम यांनी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांना कारवाई करण्या संदर्भात पत्र पाठवले असून सदर पत्राचे अनुषंगाने मंगळवेढा मंडळाधिकारी यांनी सदर पिता-पुत्रांच्या मंगलकार्यालय व खडीक्रेशर चे चौकशीचे आदेश काढले आहेत त्यानुसार दि 27 रोजी मंगलकार्यालय व खडीक्रशरची  चौकशी होणार असून महसूल प्रशासन फक्त चौकशी करणार की कारवाई करणार याकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.

पाटखळ येथील दामाजी स्टोन क्रेशरला उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी 2018/19 ला शासकीय शील बंद केलेले छायाचित्रात मध्ये दिसत आहे

              पिता-पुत्रांचे खडीक्रशर हे गं.न 392 मध्ये असुन रस्त्याच्या वर्गीकृत महामार्ग क्रमांक 65 गेला असून सदरील खडीक्रशर प्रयोजनासाठी नगर साहाय्य रचना सोलापूर यांच्या कार्यालयाने ही जागा खडीक्रशर प्रयोजनासाठी देता येत नसल्याचे पत्र देऊन ही वारंवार  2018/2019 उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी सदर खडीक्रेशर शासकीय सील बंद केले होते. मंगळवेढा महसूल प्रशासन वारंवार सदरील व्यक्तीला राजकीय वरदहस्तामुळे पाठीशी घालत असल्याचे दिसत असून त्यांच्यावर कारवाई करन्यासाठी अँड.रमेश जोशी हे मैदानात उतरले असून  महसूल विभाग पाठीशी घालणार की कारवाई करणार याकडे पाटकळमधील जनतेचे लक्ष लागले आहे 

     अँड.रमेश जोशी हे  हाती घेतलेल्या कोणत्याही प्रकरणात  कारवाई होई पर्यंत पाठपुरावा करतात अशी त्यांची ख्याती असून त्यांनी हे खडी क्रशर मंगलकार्यालयाचे  प्रकरण हाती घेतल्याने कारवाई होईपर्यंत ते थांबणार नाहीत असे दिसून येत आहे

Pages