आंदोलनाच्या रेटयामुळे पोलिस महानिरिक्षकांनी त्या पोलिस निरिक्षकाचे काढले चौकशीचे आदेश.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, January 11, 2022

आंदोलनाच्या रेटयामुळे पोलिस महानिरिक्षकांनी त्या पोलिस निरिक्षकाचे काढले चौकशीचे आदेश....दिव्य न्यूज नेटवर्क


               मरवडे येथील भक्ती व नम्रता चव्हाण या दोन मुलींच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ,मंगळवेढा शहरातील दोन दरोडे व ग्रामीण भागातील पडोळकरवाडी येथील दरोडयातून झालेला खून या गंभीर घटनेचा तपास लावण्यात मंगळवेढा पोलिस अधिकार्‍यांना अपयश आल्याने गेले अठवडाभर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्यासह कार्यकर्ते धरणे आंदोलन करीत आहेत.दरम्यान,कोल्हापूर विभागाचे पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया यांनी पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश काढले असल्याचे  आंदोलकांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

                मरवडे येथील भक्ती व नम्रता चव्हाण या दोन बहिणींचा डेअरीतून आणलेले बासुंदी,श्रीखंड खाल्ल्याने विषबाधेतून मृत्यू झाला होता.तर आई वडील अत्यावस्थेत दवाखान्यात होते.चव्हाण कुटुंबियांना मुलाऐवजी केवळ दोन मुलीच होत्या.त्या मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार तुटला आहे.चव्हाण कुटुंबिय मंगळवेढा पोलिसात फिर्याद देण्यास आल्यानंतर पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.तसेच मंगळवेढा शहरात संजय हजारे,मंदाकिनी सावंजी,पडोळकरवाडी येथील नकुशा कोंडीबा मदने(वय 65) हिचा दरोडेखोरांनी खून करून अंगावरील दागिने लुटले.आदी गंभीर घटना घडल्या असताना व सतत पडणार्‍या दरोडयामुळे नागरिकांची असुरक्षितता निर्माण झाली आहे.       


                परिणामी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिस निरिक्षक गुंजवटे यांना अपयश आल्याने या विरोधात जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.कार्यालय,मंगळवेढा समोर दि. 3 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन गेली आठवडाभर सुरु आहे.या बेमुदत आंदोलनाची गांभीर्यपूर्वक दखल घेवून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया यांनी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना त्या पोलिस निरिक्षकाच्या कामकाजाबाबत चौकशीचे आदेश काढले असून प्रत्येक मुद्दयावर चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले.


Pages