तोडपाणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची आ.प्रशांत परिचारकानी केली विधानपरिषद पोलखोल.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, December 26, 2021

तोडपाणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची आ.प्रशांत परिचारकानी केली विधानपरिषद पोलखोल....

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

               सोलापुर जिल्हयामध्ये महामार्गाचे काम जोरात चालु असून शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला देत असताना अधिकारी मोठया प्रमाणावर टक्केवारी घेत असल्याचा गंभीर आरोप आ.प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेत बोलताना केला.या आरोपा मुळे खळबळ माजली असून हे अधिकारी कोण या बाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे.

           सोलापुर जिल्यातुन जाणार्‍या महामार्गासाठी शेतकर्‍यांची जमिन मोठया प्रमाणावर संपादित करण्यात आली असून या संपादित जमिनीचा मोबदला देण्याचे काम महसुल विभागा मार्फत चालु आहे.संपादित केलेल्या जमिनीचे मुल्य कोटयावधींच्या घरात असल्याने त्यामध्ये टक्केवारी घेण्यााचा अधिकार्‍यांचा गोरख धंदा झाला असून त्यातुन हे अधिकारी करोडो रुपये कमाई करीत आहेत.आ.प्रशांत परिचारक यांनी केलेल्या या आरोपामुळे अधिकार्‍यांची हप्ते बाजी चव्हाटयावर आली आहे.

            


                   महामार्ग संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी अधिकार्‍यांची तोडपाणी आ.प्रशांत परिचारक यांचा विधानपरिषदेत गंभीर आरोप शेतकर्‍यांच्या महामार्गासाठी संपादित होणार्‍या जमिनीचे मुल्याकंन करताना त्यामध्ये बागायत,जिराईत अशी वर्गवारी करण्यात येते.तसेच संपादित होणार्‍या जमिनीमध्ये पिक असल्याचा खोटा पुरावा तयार केला जातो.तसेच या जमिनीत असलेली बांधीव घरे,झाडे यांची संख्या जास्त दाखविली जाते त्यामुळे मिळणार्‍या मोबदल्याच्या रकमेत लाखो रुपयांची वाढ होते. व वाढ झालेली रक्कम अधिकारी  वाटुन घेत आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या करोडो रुपयांचा अपहार होत आहे.

                  मंगळवेढा,सांगोला,मोहोळ,पंढरपुर तालुक्यात असे अनेक प्रकार घडले असून मंगळवेढा व सांगोला तालुक्यात तर आम्ही आदिलशहाचे वशंज असुन संपादित झालेली जमिनीवर आमचा हक्क आहे अशा प्रकारच्या खोटया तक्रारी करण्यात आल्या व त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रारदार करोडो रुपये मागत आहेत.या तक्रारीचे निवारण  करण्यासाठी अधिकारीच तोडपाणी करुन पैसे कमवीत आहेत.

                  महामार्गासाठी बाधीतजमिनीचे संपादन व त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे असून प्रांताधिकारी कार्यालयात अशा दलालांचा सुळसुळाट झालेला पहावयास मिळत आहे.आ.प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याकडे या बाबत सविस्तर तक्रार करावी आपण याची चौकशी करु असे अश्‍वासन दिले आहे.पंढरपुर व मोहोळ तालुक्यातील भुसंपादन व मोबदला देण्याचे काम पंढरपुर प्राताधिकारी कार्यालयातुन चालते या कार्यालयातही दलालांचा सुळसुळाट झाला असून मोठया प्रमाणावर तोडपाणी करुन संपादित जमिनीची रक्कम शेतकर्‍यांना दिली जात आहे.

               अनेक प्रकरणात नवीन शर्तभंग केल्या बाबत तक्रारी असताना व अनेक प्रकरणात संपादित होणारी जमिन ही वादग्रस्त असताना त्या बाबत आलेल्या तक्रारीचा विचार न करता मोठी रक्कम घेवुन संबधींत रक्कम अदा करण्यात आली आहे.त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची चौकशी होणे गरजेचे आहे.

Pages