पाच वर्षे कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्या शेतकर्‍यास शेत मोजणीस न्याय मिळत नसल्याचा आक्रोश,भूमी आभिलेख कार्यालयाचा आजब कारभार... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, December 25, 2021

पाच वर्षे कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्या शेतकर्‍यास शेत मोजणीस न्याय मिळत नसल्याचा आक्रोश,भूमी आभिलेख कार्यालयाचा आजब कारभार...दिव्य न्यूज नेटवर्क 


                   ब्रम्हपुरी येथील एका शेतकर्‍याने मंगळवेढयातील भूमी अभिलेख कार्यालयाकडे शेत मोजणी व हद्दी कायम करण्यासाठी तीन हजार रुपये भरून पाच वर्षाचा कालावधी उलटूनही अदयाप त्या शेतकर्‍याची शेतमोजणी न करता त्याचे रेकॉर्ड कार्यालयाने बंद केल्याने पैसे जावूनही शेतमोजणी न झाल्याने सदर शेतकर्‍याला पश्‍चाताप करण्याची वेळ आल्याने या कार्यालयातील कामकाजाबाबत शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

                    ब्रम्हपुरी येथील शेतकरी औदुंबर कृष्णा कोकरे यांनी गट क्र.112 ची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी तातडीची मोजणी म्हणून प्रथम दि. 31/8/2016 रोजी दोन हजार रुपये रक्कम भरली होती.दि.2 ऑक्टोबर 2016 रोजी कार्यालयाचे सदर शेतकर्‍याला मोजणीचे लगतदारासह नोटीस प्राप्त झाली. तत्कालीन भू करमापक डांगे हे शेतमोजणीसाठी शेतावर आल्यानंतर शेत परिसरात ऊसाचे पिक असल्यामुळे अडथळा येत असल्याचे कारण दाखवून ती मोजणी रद्द केली. नंतर कार्यालयाकडून शेतकरी कोकरे यांना पुन्हा हजार रुपये भरा मोजणी केली जाईल असा सोज्वळ सल्ला दिला.त्याप्रमाणे शेतकर्‍याने दि.6 फेब्रुवारी 2017 रोजी स्टेट बँकेत एक हजाराचे चलन केले. असे एकूण त्या शेतकर्‍याचे मोजणीसाठी तीन हजार रुपये रक्कम भरून पाच वर्षाचा कालावधी लोटला.अदयापही शेतकर्‍यास मोजणी करून देण्यात आली नाही. शेतकरी मात्र भूमी अभिलेख कार्यालयाचे गेल्या पाच वर्षापासून उंबरठे झिजवत आहे.

             अधिकार्‍यांकडूनही या बाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्‍न शेतकर्‍यापुढे उभा आहे.अजूनही पैसे भरा त्याशिवाय मोजणी होणार नसल्याचे वारंवार कार्यालयाकडून सांगण्यात येत असल्याचे कोकरे यांनी सांगितले.सध्या पैसे जावूनही शेत मोजणी होत नसल्याने शेतकर्‍याला मनःस्ताप सहन करावा लागत आहे.येथील अधिकार्‍यांचा कार्यकाल पूर्ण होत आला असतानाही शेतकर्‍याला शेतमोजणीचा न्याय न मिळाल्यामुळे आता त्यांच्या कार्यपध्दतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचे शेतकरी कोकरे यांनी सांगितले

Pages