कर्नाटकात ओमीक्रॉनचे दाेन रूग्ण सापडल्याने मंगळवेढा नजिक कर्नाटक सिमा भाग सिल करन्याची मागणी..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, December 3, 2021

कर्नाटकात ओमीक्रॉनचे दाेन रूग्ण सापडल्याने मंगळवेढा नजिक कर्नाटक सिमा भाग सिल करन्याची मागणी.....


 


मंगळवेढा/प्रतिनिधी

              कर्नाटक राज्यात जिवघेण्या अशा ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे दाेन रूगण सापडल्याने  कर्नाटक राज्याची हद्द मंगऴवेढा पासुन २० कि.मी.आंतरावर आसल्याने पाेलीस प्रशासनाने सिमा भाग सिल करून त्याचा शिरकाव मंगळवेढ्यात हाेणार नाही याची दक्षता घ्यावी आशि मागणी हाेत आहे.

             कर्नाटकात या संसर्ग साथीचे दाेन रग्ण  सापडल्याने कर्नाटक लगत असणार्‍या सोलापूर जिल्हयातील जनतेची चिंता वाढली आहे.कर्नाटकात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण आढळून  आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्यानंतर  सोलापूर जिल्हयातील जनतेची डोकेदुखी वाढल्यामुळे महसूल प्रशासन,पोलिस प्रशासन व आरोग्य यंत्रणेने यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

             सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा,अक्कलकोट व दक्षिण सोलापूर हे तालुके कर्नाटक सीमेवरती आहेत.कर्नाटकातील नागरीक या  तालुक्यातूनच सोलापूर जिल्हयात येत असतात. श्री.दत्त भक्तांचे श्रध्दास्थान हे गाणगापूरात असून देवदर्शनासाठी सोलापूर जिल्हयातील अनेकजण गाणगापूरला जात असतात. तर कर्नाटकातील अनेक भाविक श्री स्वामी समर्थ व पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनासाठी मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्यात येत जात असतात.तसेच मंद्रूपमार्गे कर्नाटकात जाणारा रहदारीचा रस्ता आहे.येथेही सतत वाहनांची वर्दळ सुुरू असते. कर्नाटकातील चडचणमधे कपडे खरेदीला मंगळवेढा व आन्यभागातुन मुबलक लाेक जात आसतात.

              कर्नाटकात घुसलेला ओमीक्रॉन महाराष्ट्रात पसरण्यासाठी मंगळवेढा,अक्कलकोट व दक्षिण सोलापूर हे मुख्य मार्ग असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी सोलापूर जिल्हयातील नागरिक करीत आहेत.मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ येथे कर्नाटक सीमा असल्याने नागरिकांची तेथे कसून तपासणी करण्यात यावी,याबाबत पोलिस व महसूल प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सीमा सील करून कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्‍या प्रत्येकाचे दोन लसीचे डोस पुर्ण झालेले प्रमाणपत्र,72 तासाचे आर.टी.पी.सी.आर.चाचणी प्रमाणपत्र तपासावे किंवा सीमेवरती रॅपीड अँटीजेन टेस्ट करूनच त्यांना प्रवेश दयावा.

              सोलापूर जिल्हा कोरोनापासून मुक्त आसताना साेलापुर शहरातील ऐका किराणा दूकान दाराला काेराेना लागन झाल्याने संपुर्ण जिल्हाला लागण हाेऊन आनेकांचे जिव गेले भविष्यात पुर्वी सारखा प्रकार घडूनये याची खबरदारी घ्यावी आशी नागरीकांची मागणी आहे.



Pages