मंगळवेढयात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचे छापे,80 हजाराचा मुद्देमाल जप्त,10 आरोपींवर गुन्हे दाखल.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, December 15, 2021

मंगळवेढयात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचे छापे,80 हजाराचा मुद्देमाल जप्त,10 आरोपींवर गुन्हे दाखल....



दिव्य न्यूज नेटवर्क 


               मंगळवेढा पोलिसांनी अवैध दारू व्यवसाय करणार्‍यांवर कारवाईची मोहिम उघडली असून मंगळवारी मरवडे येथे 3 ठिकाणी,देगाव,डोणज,बोराळे,मंगळवेढा शहर,खडकी,लक्ष्मी दहिवडी,अकोले आदी ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दारू विक्री करणार्‍याविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.दरम्यान,मरवडे येथे सर्वात मोठी कारवाई झाली असून 59 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.मंगळवेढा पोलिसांच्या इतिहासात एकाच दिवशी एवढी मोठी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

               पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक  बापूसाहेब पिंगळे,भगवान बुरसे,अमर बामणे,सत्यजीत आवटे अशा चार अधिकार्‍यांच्या टिम कारवाईसाठी तयार करण्यात आल्या होत्या.सगळयात मोठी कारवाई मरवडे येथे दि.14 रोजी 01.15 वा. माशाळ वस्ती येथे रहात असलेला आरोपी प्रकाश बनसोडे याच्या पत्रा शेडच्या आडोशाला दारू विक्री सुुरु असल्याची माहिती मिळताच पो.नि.जोतीराम गुंजवटे,पोलिस हवालदार महेश कोळी यांनी छापा टाकला असता विना परवाना देशी विदेशी दारू विक्री आरोपी करीत असल्याचे निदर्शनास आले.

             यामध्ये 59 हजार 691 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तसेच देगाव येथे छापा टाकून 2310 रुपये,डोणज येथे छापा टाकून 1080 रूपये,मरवडे येथे दोन ठिकाणी छापे टाकून 1980 रूपये,मंगळवेढा शहर शनिवार पेठ 240 रुपये,खडकी 960 रुपये,लक्ष्मी दहिवडी 780 रुपये,बोराळे 4560 रुपये,अकोले  येथे ताडी 900 रुपये असा एकूण  80 हजाराचा मुद्देमाल छापा टाकून पोलिसांनी विविध ठिकाणाहून जप्त केला आहे.यामध्ये दशरथ बाबा खरात,रमजान अमिन शेख,शिवाजी दादा ढेकळेे,मोहन प्रल्हाद मंडले,चैतन्य रामचंद्र धनवे,बाळासाहेब सोपान पवार,तिमय्या गंगाप्पा पुल्लूर,नंदकुमार महादेव टोणपे,प्रकाश आण्णा खरात,कल्लाप्पा नागाप्पा दांडेकर आदीविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



Pages