मंगळवेढयातील 12 ग्रामपंचायतीच्या 17 पोटनिवडणूक जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 23, 2021

मंगळवेढयातील 12 ग्रामपंचायतीच्या 17 पोटनिवडणूक जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान....दिव्य न्यूज नेटवर्क 

                मंगळवेढा तालुक्यातील 12  ग्रामपंचायतीमधील 17 जागेच्या पोटनिवडणूकीसाठी दि.21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होत असून दि.30 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज  भरण्यास प्रारंभ होणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.

          पोटनिवडणूक होणारी गावे व प्रभाग पुढील प्रमाणे -खडकी (3),संत दामाजीनगर(5,4,2),जुनोनी (1,1), जित्ती(1), रहाटेवाडी(1,3,3),गोणेवाडी (2),लवंगी(3), धर्मगाव(2), जंगलगी(3), जालिहाळ(1), ब्रम्हपुरी(1), उचेठाण(2) आदी रिक्त असलेल्या जागेसाठी पोटनिवडणूक दि.21 डिसेंबर रोजी होत आहे.या निवडणुकीसाठी दि.30 नोव्हेंबर तर 6 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. 

             अर्जाची छाननी 7 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 ते अर्ज संपेपर्यंत,अर्ज माघार दि.9 डिसेंबर दुपारी 3.00 पर्यंत.तसेच त्याच दिवशी दुपारी 3.00 नंतर चिन्ह वाटप होईल.या निवडणूकीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे होणार आहे. ही पोटनिवडणूक निधन,राजीनामा व अपात्र झालेल्या रिक्त जागेमुळे होत आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली असल्याचे निवडणूक कामकाज पाहणारे अव्वल कारकून उमाकांत मोरे सांगितले.

Pages