बाजार समितीचे बेस्ट चेअरमन पुरस्काराने सोमनाथ आवताडे सन्मानित - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 29, 2021

बाजार समितीचे बेस्ट चेअरमन पुरस्काराने सोमनाथ आवताडे सन्मानित

 


     

दिव्य न्यूज नेटवर्क 

            कमी वयात चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसत आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवत मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपास आणली डाळिंब सौदे कांदा सौदे सुरू करत राज्यात विक्रमी दर दिला त्याचबरोबर जनावरासाठी आठवडा बाजार सुरू केला तसेच शेतकऱ्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेतले त्यांच्या या कार्याची दखल घेत मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ अवताडे यांना नुकताच बेस्ट चेअरमन ऑफ मार्केट कमिटी हा पुरस्कार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे प्रदान करण्यात आला .सोमनाथ आवताडे यांनी पदभार घेतल्यावर बाजार समितीच्या आवारामध्ये डांबरीकरण हाय मस्ट दिवे अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नवं महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवार्ड 2021 त्यांना बेस्ट चेअरमन ऑफ मार्केट कमिटी हा पुरस्कार दिला.

              यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्या शुभेच्छा दिल्या सोमनाथ अवताडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यासह सचिव म्हणून नियोजन बद्ध काम पाहणारे सचिन देशमुख यांच्यावर मंगळवेढा पंढरपुर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून मंगळवेढा पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे,विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक उद्योजक संजय अवताडे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती प्रेरणा मासाळ,मा उपसभापती प्रदीप खांडेकर,धनंजय पाटील, दिगंबर यादव आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

       महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मंगळवेढा बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे

Pages