अप्पासाहेब समिंदर मंगळवेढ्याचे तर गजानन गुरव पंढरपूरचे प्रांत ; उज्वला सोरटे, मोहिनी चव्हाण यांची बदली तर बाळासाहेब शिरसाट यांच्याकडे अक्कलकोट... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, September 18, 2021

अप्पासाहेब समिंदर मंगळवेढ्याचे तर गजानन गुरव पंढरपूरचे प्रांत ; उज्वला सोरटे, मोहिनी चव्हाण यांची बदली तर बाळासाहेब शिरसाट यांच्याकडे अक्कलकोट...

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

              राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील 19 उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये सोलापूर महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे पंढरपूर प्रांताधिकारी म्हणून पदस्थापना मिळाली आहे तर अन्नधान्य वितरण अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे तसेच पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना सांगली जिल्ह्यात महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे .

            विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची भंडारा निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे, मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्यात विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.त्याचबरोबर महसूल विभागाने राज्यातील 14 तहसीलदारांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांची बदली झाली आहे त्यांना सातारा या ठिकाणी स्थावर व्यवस्थापक राज्य शेती महामंडळ पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

            सोलापुरातील करमणूक कर शाखेचे बाळासाहेब शिरसाट यांची अक्कलकोट तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची बदली अमरावती या ठिकाणी झाली असून त्यांच्या जागेवर पुणे येथून सोनाली मेटकरी या येत आहेत. मोहोळचे नायब तहसीलदार राजकुमार लिंबारे यांची पदोन्नती झाली असून ते तहसीलदार झाले आहेत. प्रशांत बेडसे यांची मोहोळच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.Pages