विजेचा अनाधिकृत आकडा काढण्यास गेलेल्या विज वितरण कर्मचार्‍याच्या श्रीमुखात लगावले.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, September 19, 2021

विजेचा अनाधिकृत आकडा काढण्यास गेलेल्या विज वितरण कर्मचार्‍याच्या श्रीमुखात लगावले..

 

 मरवडे येथील घटना, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल..दिव्य न्यूज नेटवर्क


             मरवडे येथे विज वसुलीस गेलेल्या पथकातील एका कर्मचार्‍याच्या  श्रीमुखात लगावून आमचा आकडा का काडला असे म्हणून धक्का बुक्की करून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी समाधान पांडुरंग जाधव व मोहन मारूती फटे रा. मरवडे या दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती असे की यातील फिर्यादी तथा महावितरणचे शाखाधिकारी संदिप माळी यांच्यासह वायरमन सुरज रामचंद्र घुले, वरिष्ठ तंत्रज्ञान सचिन विश्‍वनाथ वठारे, वरिष्ठ यंत्रचालक विठ्ठल शिवाप्पा केंगार, संतोष मारूती गाताडे, नवनाथ रामचंद्र शिंदे, अजिम युनुस चौधरी (बेगमपूर), हे पथक दिनांक 17 रोजी दुपारी 1.30 च्या दरम्यान मरवडे गावात लाईट बिल वसुलीसाठी गेले होते. पांडुरंग जाधव यांच्या घरासमोरील लाईटच्या डांबावर आकडा टाकून लाईट घेतलेली या पथकाला दिसली. सदरचा आकडा काढून वायर घेऊन जात असताना आरोपी समाधान जाधव याने माझा आकडा का काढला या कारणावरून वाद विवाद घालत शिवीगाळ करून गच्चीला धरून धक्का बुक्की केली.

            यावेळी पथकातील सुरज घुले हे भांडण सोडवण्यास मधे आले असता तु मध्ये पडायचा काय संबंध असे म्हणून त्याच्या जोरात श्रीमुखात लगावले. तदनंतर आरोपी मोहन फटे यांच्याकडील थकबाकी वसुलीस पथक गेल्यावर मी लाईट बिल भरत नाही तुम्हाल काय करायचं ते करा असे म्हणत कर्मचारी लाईट कट करत असताना शिवीगाळ, दमदाटी करून लाईट कट करू दिले नाही. वरील दोघांआरोपींनी सरकारी कामात अडथळा आणला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Pages