लक्ष्मीदहिवडी व नंदूर वीज उपकेंद्रास मंजुरी व निधीची तरतूद झाल्याने लवकरच उभारणी :-भगीरथ भालके - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, September 7, 2021

लक्ष्मीदहिवडी व नंदूर वीज उपकेंद्रास मंजुरी व निधीची तरतूद झाल्याने लवकरच उभारणी :-भगीरथ भालके


मंगळवेढा/प्रतिनिधी

                   मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी आणि नंदुर या भागातील शेतकऱ्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे नव्याने  दोन वीज उपकेंद्र मंजूर झाली असून त्यासाठी निधीची देखील तरतूद झाली असल्याने उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी दिले.

             मंगळवेढा तालुक्यातील माण व भीमा नदीकाठी पाणी असून देखील शेतकऱ्यांना अपुऱ्या व कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते तसेच  आंधळगाव व बोराळे विजउपकेंद्रावर भार पडत असल्याने काही भागात आठ तासापेक्षा कमी व काही वेळा अपुरा वीजपुरवठा होत होता त्यामुळे नंदूर व लक्ष्मी दहिवडी भागातील शेतकऱ्यांनी तत्कालीन आमदार स्व.भारत भालके यांच्याकडे नवीन वीज उपकेंद्र करण्याची मागणी केली होती तसेच नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत लक्ष्मी दहिवडी येथील सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लक्ष्मी दहिवडी येथे तातडीने विजउपकेंद्र करण्यासाठी निवेदन दिले होते.

                 त्यानंतर विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी गेल्या पाच महिन्यापासून येथील सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी लवकर  विजउपकेंद्र होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,ऊर्जामंत्री नितीन राऊत,पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे सातत्याने पत्राद्वारे व समक्ष भेटून पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नास यश येऊन लक्ष्मी दहिवडी व नंदूर येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रास मंजुरी मिळाली असून या दोन्ही कामासाठी शासनाने सुमारे सात कोटींचा निधी देखील दोन योजनांतून मंजूर केला आहे  या नवीन होणाऱ्या वीज उपकेंद्रामुळे लक्ष्मी दहिवडी सह लेंडवे चिंचाळे अकोला व गुंजेगाव येथील शेतकऱ्यांना लाभ होणार असून आंधळगाव येथील वीज उपकेंद्र वरील भार कमी होणार आहे तसेच नंदूर येथील नव्याने होणाऱ्या वीज उपकेंद्र मुळे डोनज बालाजीनगर भालेवाडी कात्राळ या भागातील शेतकऱ्यांना लाभ होऊन बोराळे येथील उपकेंद्रा वरील भार कमी होऊन याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे लक्ष्मी दहिवडी येथील विजू उपकेंद्रासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून जागा संपादनाची कार्यवाही देखील सुरू केले आहे तर नंदूर येथील विज उपकेंद्रासाठी जागेची पाहणी सुरू आहे.

              विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लक्ष्मी दहिवडी करांना दिलेला शब्द पाळल्यामुळे शब्दाला जागणारा नेता म्हणून ख्याती असलेल्या अजित दादा बद्दल येथील शेतकऱ्यांना प्रचिती आली आहे या दोन्ही वीज उपकेंद्राच्या मंजुरी व निधीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ऊर्जा मंत्री नितीन राऊत जलसंपदा मंत्री जयंत पाटील पालकमंत्री दत्तामामा भरणे व महावितरण च्या सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले असून भविष्यात देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी व हितासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातू सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी व नंदुर या दोन ठिकाणी नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले असून त्यासाठी निधीची देखील तरतूद झाली असून उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे.

                     संजय शिंदे

उपकार्यकारी अभियंता मंगळवेढा उपविभाग महावितरण

Pages