जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य विकासकामातील निधीच्या टक्केवारीतील आशेवर.!! - Divyaprabhat News

Breaking News

Friday, August 27, 2021

जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य विकासकामातील निधीच्या टक्केवारीतील आशेवर.!!


मंगळवेढा/प्रतिनिधी


               मंगळवेढा तालुक्यात काही जि.प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी आपला विकासनिधी देताना टक्केवारी घेऊन निधी वाटप  करीत आहेत जे टक्केवारी देतील त्यांनाच निधी दिला जात  आहे मात्र निवडणुकीत पार्टीसाठी काम करून ही निधी वाटपात डावलले गेलेल्या काही कार्यकर्त्यांना दि.25 रोजी संताप अनावर झाल्याने  जिल्हा परिषद उपाध्यक्ष,माजी सभापती  जि.प.सदस्य व पंचायत समिती सदस्य आदी पदाधिकारी यांना  येथील  खुद्द सभापती च्या कार्यालयात शिव्यांची लाखोली वाहत टक्केवारी व निधी वाटपातील दुजाभावातील जाब विचारला,यावेळी आक्रमक झालेल्या त्या कार्यकर्त्यामुळे सर्व पदाधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले होते या प्रकाराची मात्र तालुकाभर चवीने चर्चा होत असून शासनाने दिलेल्या निधीला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून निधी शासनाचा मिजास मात्र लोकप्रतिनिधींची चालू असल्याचे चित्र दिसत आहे.

                   सोलापूर जिल्हा परिषद गेल्या काही दिवसापासून पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील  अंतर्गत वादामुळे आर्थिक देवघेवी मुळे  चर्चेत आहे विकासकामासाठी मिळत असलेल्या निधी साठी अधिकारी व  पदाधिकारी टक्केवारी मोजावी लागत असल्याची तक्रार देखील  काही जीप सदस्यांनी केली होती मंगळवेढा तालुक्यात देखील याचे लोण काही दिवसापासून पोचले असून येथील काही जीप सदस्य व पंचायत समिती सदस्य विकास निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याच्या व निधी घेण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी कडून टक्केवारी मागितली जात असल्याच्या तक्रारी काही कार्यकर्त्यांनी नेतेमंडळी कडे केल्या होत्या त्यावर काही लोकप्रतिनिधी नी आमचा खर्च कोठून काढणार असे  प्रतिप्रश्न त्या कार्यकर्त्यांना विचारले होते त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील काही सदस्यांनी शासनाकडून विकास कामासाठी आलेल्या निधीची टक्केवारी घेऊन विक्रीचे दुकान मांडल्याचे समोर आले आहे.       

         अधिकाऱ्याकडून भांडून निधी घ्यायचा व गावागावातील काही ठेकेदार कम राजकीय कार्यकर्त्यांना टक्केवारी घेऊन निधी देणे हा त्यांचा धंदा  झाला असून वैयक्तीक व सार्वजनिक लाभाच्या योजना देण्यासाठी 10 ते 30 टक्के इतकी रक्कम हे जनसेवक खिशात टाकत असून कामे मात्र निकृष्ट करीत असल्याचे दिसून येत आहे काहीजण  तर आपला निधी मतदार संघाच्या बाहेर देऊन निधी वाटत आहेत या टक्केवारीच्या वाढत्या प्रथेमुळे निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मात्र फुकट मरू लागले निवडणुकीत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूनदेखील निवडून आल्यानंतर टक्केवारी घेऊन व निधी वाटपात दुजाभाव होत असल्याने येथील काही कार्यकर्ते या सदस्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराज झाले.

                दि.25 रोजी दु 2 ते 3 च्या दरम्यान या कार्यकर्त्यांचा उद्रेक अनावर झाल्याने ते कमालीचे आक्रमक झाले येथील सभापती कार्यालयात जीपचे उपाध्यक्ष,एक महिला जि.प.सदस्या,माजी सभापती,विद्यमान सभापतीचे मिस्टर,काही गावचे सरपंच उपस्थित असताना त्या पश्चिम भागातील काही कार्यकर्त्यानी त्या सर्व पदाधिकारी यांना आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून पळालो तुम्ही मात्र निवडून आल्यानंतर विकास कामाचा निधी देताना टक्केवारी मागता,ठराविक गावाला सर्व निधी देता आम्ही काय नुसते मोकळे पळायचे का असे म्हणत शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या कार्याचा,कामकाजाचा उद्धार केला यावेळी उपस्थित पदाधिकारी व काही सरपंच मात्र आवक झाले कोणताही ब्र शब्द न करता शांत राहणे पसंद केले तर काहींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच आई सदस्य असताना सर्व कामकाज पाहणाऱ्या त्या शिक्षक सदस्याला देखील फोन करून चांगलेच बोल सुनावले गेल्या काही दिवसापूर्वी आंधळगाव येथील एका कार्यकर्त्याने  देखील एका महिला जि.प.सदस्याला आपल्या नेत्यासमोर टक्केवारीच्या कारणावरून चांगलेच फैलावर घेतल्याची घटना घडली होती एकंदरीत निवडणुकीत कार्यकर्त्यांचा वापर करून घेऊन निवडून आल्यानंतर कार्यकर्त्या वाऱ्यावर सोडून देत सध्या टक्केवारी घेऊन विकासनिधी वाटणाऱ्या त्या जीप च्या व पंचायत समितीच्या सदस्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

              निवडणुकीच्या तोंडावर सुचवलेली व मंजूर झालेली कामे टक्केवारी साठी बदलून घेत सुधारित मंजुरी घेऊन कामे करण्यावर काही सदस्यांनी सपाटा लावल्याचे सध्या दिसून येत आहे सध्या जिल्हा परिषदेत भाजपाची  सत्ता असून येथील काही जि.प.व पंचायत समिती सदस्य हे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे समर्थक आहेत  त्या सदस्यांवर भाजपाच्या  युवा मोरच्याच्या माजी अध्यक्षासह इतर कार्यकर्त्यांनी राडा करत त्या जनसेवकांचे पितळ उघडे पाडले आहे सदस्यांच्या या विकास कामांच्या निधीला टक्केवारीच्या भ्रष्टयाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.

                 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पार्टीचे सदस्य निवडून आणण्यासाठी  आम्ही रात्रीचा दिवस केला परन्तु  निवडून आल्यावर जिल्हापरिषद उपाध्यक्ष ,जीप सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याकडून विकासकामांसाठी निधी देताना दुजाभाव केला जात असून  निधी देताना  देखील टक्केवारी शिवाय निधी मिळत नाही  लक्ष्मी दहिवडी गणाच्या सदस्या महिला असून त्यांचा कारभार मात्र त्यांचे शिक्षकपुत्र  धनंजय पाटील हे  पाहतात ते शिक्षक असतानादेखील उघड राजकारण करीत असून 15 व्या वित्तआयोगातील 11 लाखापैकी 7 लाख निधी एकट्या दहिवडी गावाला दिला इतर गावांना निधी देण्यास टाळाटाळ केली जात असून त्या सदस्य पुत्र शिक्षकाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी तसेच तालुक्याला दिलेल्या सर्व वैयक्तिक व सार्वजनिक विकासकामाच्या निधीची चौकशी व्हावी.

                                आबासाहेब लांडे 

             माजी तालुकाअध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मंगळवेढा


 

Pages