विज कनेक्शन तोडल्या प्रकरणी जनहित शेतकरी संघटनेने विज वितरणच्या अधिकार्‍याला घातला घेरावा... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, July 23, 2021

विज कनेक्शन तोडल्या प्रकरणी जनहित शेतकरी संघटनेने विज वितरणच्या अधिकार्‍याला घातला घेरावा...



.........अखेर विज वितरण कंपनीने तोडलेली कनेक्शन जोडली,आंदोलनाला आले यश...



दिव्य न्यूज नेटवर्क


                    मंगळवेढयातील विज वितरण कंपनीने थकित बिलापोटी कनेक्शन कट केल्यामुळे ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याने संतापलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री 7.30 वा. शहरचे कनिष्ठ अभियंता यांना घेरावा घालून आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनाला यश आले असून विज वितरणच्या अधिकार्‍यांनी तोडलेली 30 कनेक्शन पुर्ववत केल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

राज्यभरात  मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्ग साथीने धुमाकूळ घातल्याने गोरगरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

                अशा परिस्थितीत विज वितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विज बिले देवून सळो की पळो करून सोडले आहे.परिणामी पैसे न भरल्यामुळे विज वितरणच्या अधिकार्‍यांनी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात घरगुती उद्योग व शेतीपंपाचे थकित बिलापोटी कनेक्शन कट करण्याची मोहिम हाती घेतली आहे.साखर कारखान्याने 1500 रुपयांच्या पुढील रक्कम अदा न केल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आहे. तसेच वारंवार पडणार्‍या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने गोरगरीब मजुरांना कामे नसल्यामुळे तेही आर्थिक अडचणीत आहेत.लॉकडाऊनमुळे उद्योगधंदेही बंद असल्यामुळे त्यांनाही आर्थिक स्त्रोत नसल्यामुळे तेही आर्थिक कोंडीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी,व्यवसायिक व घरगुती ग्राहक असताना विज वितरणने रेटून वसुली सुरु केली आहे.

                 मंगळवेढा शहरात 30 घरगुती ग्राहकांचे आज कनेक्शन बंद केल्याचे समजताच जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे आपल्या कार्यकर्त्यासह संध्याकाळी 7.30 वा.मंगळवेढा येथील विज वितरणच्या कार्यालयात येवून त्यांनी शहरचे कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना घेरावा घालत घोषणाबाजी केली.कोरोना काळातही सक्तीने विज बिल वसुली सुरु केलेबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचाही निषेध करण्यात आला.घोषणाबाजीने विज वितरण कार्यालय दणाणून गेले होते.शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा समुदाय व आक्रमकता पाहून विज वितरणच्या अधिकार्‍यांनी माघार घेत तोडलेली कनेक्शन पूर्ववत केली.यापुढे कनेक्शन न तोडता विज बिले टप्याटप्प्याने भरून घेतली जातील असे लेखी पत्र देत विज वितरण कंपनीने  माघार घेतली. यापुढे जबरदस्तीने विज बिल वसुली केल्यास संंबधित अधिकार्‍याचे कपडे फाडून धिंड काढण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

                      विज वितरण कंपनी नियमाने नोटीस न देता व रिडींग न घेता कोरोना काळातील अंदाजे बिल आकारून ग्राहकांना भरडत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे यावेळी रघुनाथ चव्हाण,बिरू ढेकळे,बाळासाहेब नागणे,किशोर दत्तू,पप्पू दत्तू,अनिल दत्तू,उमेश दत्तू,अमोल माळी,नेताजी बाबर,शिवाजी कांबळे,सुरेश मुदगूल,सुखदेव डोरले,राजेंद्र मेहेरकर, बंडू मेहेरकर,रवी चेळेकर,धनंजय नवाळे यांचेसह 30 ते 40 जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.


         मंगळवेढा येथील विज वितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचेसह कार्यकर्त्यानी घेरावा घातल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

Pages