मंगळवेढा येथील अकरा पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, July 23, 2021

मंगळवेढा येथील अकरा पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती.....

 

दिव्य न्यूज नेटवर्क


              मंगळवेढा पोलिस ठाण्यातील 9 तर डी.वाय.एस.पी. कार्यालयातील 2 असे एकूण 11 पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळाली असून डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या हस्ते कर्मचार्‍यांना पदोन्नतीची फित लावण्यात आली. दरम्यान मंगळवेढा पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराचा पोलिस नाईक झाल्याचा पहिला मान कृष्णा जाधव यांना मिळाला आहे.

            जिल्हा पोलिस दलातील विविध पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ज्यांची सेवा दहा वर्षे पुर्ण झाली आहे त्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पोलिस नाईक,पोलिस हवालदार,सहाय्यक फौजदार अशी पदोन्नती देण्यात आली. यामध्ये डी.वाय.एस.पी.कार्यालयातील पोलिस शिपाई अभिजीत साळुंखे,सुनिल पवार या दोघांना पोलिस नाईकची पदोन्नती मिळाली आहे.   

          मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हणुमंत हिप्परकर (सहाय्यक फौजदार),तुकाराम कोळी,दत्तात्रय येलपले,राजकुमार ढोबळे या  तीघांना पोलिस हवालदार तसेच दर्लिंग गुरव,सचिन बनकर,कृष्णा जाधव,प्रकाश नलवडे,बापू नलवडे या पाच जणांना पोलिस नाईकची पदोन्नती मिळाली आहे.या सर्व कर्मचार्‍यांना पदोन्नतीची फित पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी लावून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.दरम्यान,कृष्णा जाधव यांना पोलिस नाईकची पदोन्नती मिळताच गुरुवार दि.22 जुलै रोजी पहिला मान ठाणे अंमलदारचा मिळाला.जाधव यांनी सकाळी 8.00 वा. श्री च्या प्रतिमेची पूजा करून ठाणे अंमलदारचा कार्यभार स्विकारला.दहा वर्षानंतर पदोन्नती मिळाल्यामुळे सर्व कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आज दिवसभर एक वेगळा आनंद दिसून येत होता.पदोन्नतीबरोबरच त्यांच्यावर अधिक कामाची जबाबदारीही वाढली आहे.

           मंगळवेढा पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या हस्ते  पदोन्नतीची फित लावल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

Pages