मंगळवेढा तहसील मधील पदांची भरती करा :- भगीरथ भालके... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 10, 2021

मंगळवेढा तहसील मधील पदांची भरती करा :- भगीरथ भालके...

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी


मंगळवेढा/प्रतिनिधी

             तालुक्यातील 23 पदे रिक्त असल्याने कार्यालयातील कामकाजात अडथळे येत असून कामात सुसूत्रता नाही यासाठी सदर पदे तात्काळ भरली जावी अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सह-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी केली आहे.

                तहसील कार्यालयात अव्वल कारकून मंडळ अधिकारी तलाठी व महसूल सहाय्यक इत्यादी पदे अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने विविध प्रकारचे दाखले सातबारा चूक दुरुस्ती रस्ते संबंधित केसेस अभिलेख कक्षातील नक्कल अशा नानाविध प्रकारच्या कामकाजासाठी नागरिकांची तहसील कार्यालयामध्ये रेलचेल वर्दळ असते तहसील कार्यालयात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना अधिकच्या कामामुळे कामाचा अतिरिक्त ताण येत आहे त्यामुळे तहसील कार्यालयातील महसूल विषयक कामकाजावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत.

               


             तहसील कार्यालयातील विविध अनुषंगाने असणारी पदे भरण्यात आली तर कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता येऊन तालुक्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामाविषयी समाधान होईल व रिक्त जागेवरील प्रलंबित कामे मार्गी लागतील यासाठी सदर 23 रिक्त पदे तात्काळ भरणे याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी भूमिका जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी पत्राद्वारे मांडली असून या पत्राची प्रत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे

Pages