प्राची डांगे हिची इन्फोसिस आय.टी.कंपनीत निवड..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 10, 2021

प्राची डांगे हिची इन्फोसिस आय.टी.कंपनीत निवड.....
मंगळवेढा/प्रतिनिधी  

           कचरेवाडी येथील प्राची राजेंद्र डांगे हिची बेंगलोर येथील इन्फोसिस या नामांकित आय.टी.कंपनीत  निवड झाली आहे.दरम्यान,ग्रामीण भागातील एका शिक्षकाच्या मुलीची निवड झाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       


                कु.प्राची डांगे ही राजेंद्र डांगे ही लोणार जि.प.शाळेत कार्यरत असलेले  शिक्षक राजेंद्र डांगे यांची कन्या आहे.तीचे प्राथमिक  व माध्यमिक शिक्षण तीच्या मूळ गावी कचरेवाडी येथे झाले.इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परिक्षेत तीने गुणवत्ता यादीत क्रमांक पटकाविला होता.या यशाबद्दल सरपंच बाळासाहेब काळुंगे,सोसायटी चेअरमन महादेव आवताडे,राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय चेळेकर,तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे,उपाध्यक्ष आण्णासोा मोहिते,बाळासाो दुधाळ,संत दामाजी सोसायटीचे चेअरमन उषा भाकरे,महिला आघाडीच्या भिंगे पाटील,मुख्याध्यापिका सुजाता पुजारी,उषा कोष्टी,रंजना घोडके व आई सुनिता डांगे यांनी तीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Pages