जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हुलजंती येथे उभारले 25 बेडचे कोवीड सेंटर.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, May 12, 2021

जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हुलजंती येथे उभारले 25 बेडचे कोवीड सेंटर....दिव्य न्यूज नेटवर्क 

             सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोविड सेंटर उभारणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी हुलजंती येथे 25 बेड असलेल्या  कोविड सेंटरचे उदघाटन नुकतेच झाल्याने याचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थांना होणार आहे.

               सोलापूर जिल्हयात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गजन्य साथीने हाहाःकार माजविला आहे.या साथीमध्ये मृत्यूचे प्रमाणही गतवर्षीपेक्षा यंदा मोठया संख्येने असल्याने सर्वच हतबल झाले आहेत.सध्या दिवसेंदिवस रुग्णांचा आलेख वाढत असल्याने जिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी रुग्णांना बेड मिळणेही अशक्य झाल्याने सर्वाची चिंता वाढली आहे.दरम्यान,रुग्णांचे लोंढे गावपातळीवर थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  यांनी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामस्थांच्या लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्याची संकल्पना पुढे आली.या संकल्पनेला जिल्हयात ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

             मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे प्रथमच 25 बेडचे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हे कोविड सेंटर उभारले गेल्याने परिसरातील रुग्णांची सोय झाल्याने त्यांचा जीव भांडयात पडला आहे.मंगळवारी सकाळी 11.00 वा.प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, दामाजी शुगरचे माजी संचालक यादाप्पा माळी,जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अविनाश शिंदे,सरपंच मिनाक्षी कुरमुत्ते,उपसरपंच रामभाऊ माळी,डॉ.नंदकुमार शिंदे,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,प्रभारी ग्रामसेवक संजय शिंदे ,तलाठी सुभाष एकतपुरे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला.

            हुलजंती येथे लोकवर्गणीतून साकारलेल्या कोविड सेंटरचे उदघाटन प्रसंगी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले,गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण व इतर छायाचित्रात दिसत आहेत.

Pages