कोरोना रुग्णांच्या बिलांची होणार दररोज तपासणी,6 लेखापरिक्षण पथकांची नियुक्ती प्रांताधिकारी :- सचिन ढोले - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, May 5, 2021

कोरोना रुग्णांच्या बिलांची होणार दररोज तपासणी,6 लेखापरिक्षण पथकांची नियुक्ती प्रांताधिकारी :- सचिन ढोले

 


पंढरपूर/प्रतिनिधी 

                तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी तालुक्यात  शहर व ग्रामीणमध्ये 14 खाजगी रुग्णालयांना प्रशासनाने कोविड हॉस्पिटल चालविण्यास परवानगी दिली आहे. या हॉस्पिटलमधून मिळणाऱ्या बिलाबाबत अनेक तक्रारी येत आहेत.यामुळे शासन नियमाच्या आधिन राहुन रुग्णालयांमध्ये  आकरण्यात येणाऱ्या बिलांची पथकामार्फत दररोज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रातांधिकारी सचिन  ढोले यांनी दिली.

              पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात तालुक्यात 14 खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे शासननिर्णयानुसार लेखापरिक्षण करण्यात येणार आहे.  खाजगी  रुग्णालयामधील बिलांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून  लेखापरिक्षणासाठी 6 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामार्फत खाजगी रुग्णालयांच्या रँडम बेसीवर तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लेखापरिक्षण करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

            पंढरपूर शहरामधील गॅलक्सी, लाईफलाईन, श्री गणपती, जनकल्याण, ॲपेक्स , श्री विठ्ठल, पावले, वरदविनायक, मेडीसिटी, ऑक्सिजन पोलीस,  पडळकर, विठ्ठल, डिव्हीपी, तसेच करकंब येथील जगताप हॉस्पिटल  या खाजगी  14 खाजगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या संबधित हॉस्पिटल बाबत ज्या कोणाला बिलांबाबत शाशंकता असेल त्यांनी बिल अदा करण्यापूर्वी प्रांत कार्यालय पंढरपूर येथील नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा. तसेच बिलांबाबत लिखित स्वरुपात तक्रारी दाखल कराव्यात. अधिक माहितीसाठी नियत्रंण कक्षातील 8446525250 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.



Pages