मंगळवेढा शहरात विनामास्क मोकाट फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई सुरू..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, April 26, 2021

मंगळवेढा शहरात विनामास्क मोकाट फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई सुरू.....

 

16 लोकांना पोलिस ठाण्यात 6 तास बसवण्याची दिली शिक्षा....दिव्य न्यूज नेटवर्क 

            मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी चक्क मंगळवेढा पोलिसांचे पथक डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरले. दरम्यान, या पथकाने आज 16 लोकांवर कोवीड प्रतिबंधात्मक कारवाई केली तर मास्क न वापरणार्‍या  10 लोकांवर कारवाई करून 5000 रूपये दंड वसुल करण्यात आला.

                   मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच विधानसभेची पोटनिवडणुक झाल्याने अनेक राजकीय पुढार्‍यांनी सभेसाठी हजेरी लावल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. सध्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्येबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही मोठया प्रमाणात वाढ होत आहे. याला अटकाव करण्यासाठी मागील आठवडयापासून शहरातील व्यापार्‍यांनी बाजारपेठा बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला असतानाही नागरिक मात्र बिनबोभाट विनामास्क रस्त्यावरून फिरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी आज सोमवारी पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बामणे, पोलिस हवालदार कृष्णा जाधव, वाहतुक शाखेचे समाधान वाघमोडे, शहाजी जाधव, संजय गावडे, पोलिस नाईक मगन यादव, पोलिस शिपाई कल्लाप्पा कोळी, अंकुश नलवडे, होमगार्ड विश्वास चौगुले, संतोष शिंदे आदिंच्या पथकाने पोलिस स्टेशनच्या समोरील पंढरपूर-मंगळवेढा महामार्गावर आज मोटरसायकलवरून विनामास्क मोकाट फिरणार्‍या 16 लोकांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशनमध्ये जवळपास 6 तास बसवण्याची शिक्षा दिली.

         विनामास्क 10 लोकांवर प्रत्येकी 500 रूपये प्रमाणे 5 हजाराचा दंड वसुल करण्यात आला. दरम्यान ही कारवाई या पुढे नित्यनियमाने दररोज केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Pages