मंगळवेढा ब्रेकिंग:- मंगळवेढा पाेलीसाचा धाक संपुष्ठात ,चक्क पाेलीस ठाण्यातच दोन पोलिसांना कुर्‍हाडीचा धाक दाखविल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल...... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 17, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग:- मंगळवेढा पाेलीसाचा धाक संपुष्ठात ,चक्क पाेलीस ठाण्यातच दोन पोलिसांना कुर्‍हाडीचा धाक दाखविल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल......

 

मंगळवेढा/प्रतिनिधी 

            मंगळवेढा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांना कुर्‍हाडीचा धाक दाखवून  व त्याच्या दांडयाने ठोसा मारून तुम्ही पोलिस ठाण्यात  कसे काम करता बघतोच असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणत खिडक्याच्या काचा,वॉटर कुलर व टिव्ही आदी साहित्यांची नासधूस करून 75 हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी  धुळदेव जगन्नाथ अनुसे (रा.धर्मगाव रस्ता,मंगळवेढा)याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

               पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील आरोपी धुळदेव अनुसे हा दि.12 रोजी 9.15 वा.मंगळवेढा पोलिस ठाण्यात  याने येवून कर्तव्यावर असणारे फिर्यादी पोलिस नाईक बापूराव पवार व पोलिस शिपाई तांबोळी यांना कुर्‍हाडीचा धाक दाखवून धक्काबुक्की करून कुर्‍हाडीच्या दांडयाने ठोसा मारल्या व तसेच तुम्ही पोलिस ठाण्यात कसे काम करता बघतोच असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला.व हातातील कुर्‍हाडीने पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा,वॉटर कुलर,टि.व्ही,अधिकारी व कर्मचारी यांची नावे असलेला बोर्ड फोडून 75 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे पोलिस नाईक बापूराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.दरम्यान मागील वर्षीही पोलिस ठाण्यात असाच प्रकार घडल्याने त्याबाबतचा गुन्हा दाखल होता
Pages