मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात 25 बेडचे कोविड सेंटर :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या सुचना.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, April 23, 2021

मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात 25 बेडचे कोविड सेंटर :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या सुचना....

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

               रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण रूग्णालयात 25 बेडचे कोविड रूग्णालय तात्काळ सुरू करण्याची सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.येथील तहसील कार्यालयात कोरोना संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी या सूचना दिल्या यावेळी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, भगीरथ भालके,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव,उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे,पक्षनेते अजित जगताप,लतीफ तांबोळी,नगराध्यक्षा अरुणा माळी, सभापती प्रेरणा मासाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,पो.नि.ज्योतिराम गुंजवटे, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ नंदकुमार शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद शिंदे,आदीसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

                  यावेळी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांचे कोविड सेंटरमध्ये विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या.चाचण्यांचे संख्या वाढवण्यात यावी व शहरांमध्ये मास्क नसलेले नागरिक मोठ्या संख्येने आढळून येत आहे त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी.ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात यावेत आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनकडे प्रांताधिकार्‍यांनी लक्ष द्यावे.

               ग्रामीण रूग्णालयातील ओपीडी कक्ष नगरपालिकेच्या अग्निशामक च्या कार्यालयात सुरू करण्यात यावी गरोदर महिलाची प्रसुती मोफत करणार असल्याचे डाॅ.पुष्पाजली शिंदे यांनी सांगितले.रेमडेसिव्हरची टंचाई सध्या असली तर लवकर दूर होईल सध्या कठीण परिस्थिती असून सर्वांनी या परिस्थितीला सामोरे जावे शासनाने कोरोणा साखळी नियंत्रित करण्यासाठी शासनाने केलेल्या लाॅकडाऊन नागरिकांनी सहकार्य करून साखळी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले यावेळी 10 ऑक्सीजन बेड साठी आवश्यक ती यंत्रसामुग्री  भगीरथ भालके यांनी देत असल्याचे सांगितले.


Pages