पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आवश्यक साधने व व्यवस्था तात्काळ मिळाव्यात,भगीरथ भालके यांची पालकमंत्र्यांकडे मागणी.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, April 20, 2021

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आवश्यक साधने व व्यवस्था तात्काळ मिळाव्यात,भगीरथ भालके यांची पालकमंत्र्यांकडे मागणी....

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

                  पंढरपूर व मंगळवेढा भागात वाढलेल्या कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व्यापारी व नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून आरोग्य विभागाला आवश्यक ती औषधोपचाराची साधने व अत्यावश्यक म्हणून आणखी दोन कोविड केअर सेंटर तात्काळ उभी करण्यात यावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी केली आहे.    

                  गेल्या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चालल्या नंतर स्व.आ.भारत भालके यांनी आपल्या आमदार निधीतून जिल्ह्यात सर्वाधिक जास्त खर्च कोरोना च्या निवारणार्थ केला होता सध्या मंगळवेढा तालुक्यात कोविड केअर सेंटर तात्काळ उभा करणे गरजेचे असून पूर्वीच्या कोविड केअर सेंटर मध्ये जागा उपलब्ध नसल्याने आणखी चारशे लोकांची व्यवस्था होईल याबाबत विचार केला जावा तसेच कोरोनाच्या गँभीर रुग्णांना रेमडीसीवर ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपचार पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री जयंत पाटील यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली असल्याची माहिती भालके यांनी दिली.या वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर व मंगळवेढा येथे प्राधान्याने सर्व व्यवस्था तात्काळ उभी करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या जातील असे सांगितले असून.

              राज्यात सर्वत्र कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून महा विकास आघाडीकडून ब्रेक द चेन या मोहिमे अंतर्गत विळखा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा शिरकाव झाला असून ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळताच तात्काळ संबंधित रुग्णालयामध्ये चाचणी करून घेणे आवश्यक असून वेळेत त्याचे निदान झाल्यास योग्य उपचार मिळून रुग्ण बरा होऊ शकतो यासाठी तालुका आरोग्य विभागाने ग्रामीण भागात टेस्टिंग ट्रेसिंग करण्यावर भर द्यावा तसेच रुग्णाच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे.

                पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात अनेक कोरोनाग्रस्त  नागरिकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला असून सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यक असणारे औषधोपचार वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर निघू नये तसेच सातत्याने गर्दी होणाऱ्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक असून मास्क व सानीटाजरचा वापर करणे 65 वर्षाच्या पुढील व दहा वर्षाच्या आतील व्यक्तींची विशेष काळजी कुटुंबाने घेणे व सार्वजनिक ठिकाणी जात असताना तरुणांनी देखील मास्कचा वापर करणे बंधनकारक झाले आहे आपल्या परिसरातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे भालके यांनी सांगितले.

Pages