विकासाच्या नावाने खोट्या बाता मारणाऱ्या ठेकेदार उमेदवाराने काय दिवे लावले ते सांगावे :- भगीरथ भालके - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, April 10, 2021

विकासाच्या नावाने खोट्या बाता मारणाऱ्या ठेकेदार उमेदवाराने काय दिवे लावले ते सांगावे :- भगीरथ भालके

 

मंगळवेढा/प्रतिनिधी

              विकासाच्या नावाने खोट्या बाता मारणारे,ठेकेदार असणाऱ्या अवताडे यांनी  विकासाचे काय दिवे लावले आहेत ते दाखवून द्यावे तसेच कै.भारत नाना भालके यांनी मतदारसंघात काय विकास केला हे आम्ही दाखवून देतो असा घणाघात महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी केला आहे.

                   पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने डोंगरगाव,पाटकळ,शिरशी,गोणेवाडी,लेंडवेचिंचाळे,गणेशवाडी,अकोला,कचरेवाडी या ठिकाणी प्रचार दौऱ्याचे आयोजन केले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की लोकप्रतिनिधी जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी असतात हे काय आ.भारत नाना भालके यांनी जनतेला दाखवून दिले आहे जनतेच्या विविध प्रश्नासाठी ते सातत्याने लढत राहिले.        

               मंगळवेढ्यातील व पंढरपुरातील रस्ते पाणी वीज आरोग्य या सेवा नागरिकांना चांगल्या मिळावा म्हणून सरकारशी भांडत राहिले तसेच मतदार संघात विविध कार्यालय शेतकऱ्यांसाठी पिक विमा शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांना मिळाव्या यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले परंतु विरोधकांना आ.भारत भालके यांनी केलेले कामे दिसून येत नाहीत. त्यांनी त्यांचा नकारात्मक या सणाबद्दल सकारात्मक वापरण्याची गरज आहे 2009 पासून जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत असल्यामुळे व प्रत्येकाच्या हाकेला धावून जाण्याच्या भूमिकेमुळे तीन वेळा जनतेने भरभरून मतांनी निवडून दिले आहे 35 गाव पाणी पुरवठा योजना भोसे व 39 गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना यासाठी त्यांनी आपली आमदारकी पणाला लावली परंतु विरोधकांना यात राजकारण दिसत आहे तिथे तर असलेल्या भाजपच्या उमेदवाराला ही कामे दिसत नाहीत परंतु जनतेला सर्व काही माहीत आहे.

            आमदारकीसाठी तिसऱ्यांदा उभा राहिलेल्या अवताडे यांनी काय दिवे लावले हे जनते समोर येऊन सांगावे आम्हीपण केलेली कामे जनतेसमोर सांगू केवळ राजकीय द्वेषापोटी विरोधक राजकारण करीत असल्याची टीका महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी केले या प्रचार दौऱ्याच्या प्रसंगी रामेश्वर मासाळ संभाजी गावकरे अंकुश पडवळे पांडुरंग चौगुले हर्षराज बिले शहाजी उन्हाळे भीमराव मोरे नवनाथ लुगडे काकासाहेब गायकवाड देवा इंगोले परमेश्वर आवताडे आदी उपस्थित होते.

Pages