नानांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी भगीरथला विधानसभेत पाठवा :- अजित पवार - Divyaprabhat News

Breaking News

Friday, April 9, 2021

नानांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी भगीरथला विधानसभेत पाठवा :- अजित पवार

 

मंगळवेढा/प्रतिनिधी

              सहकार खाते सुभाष देशमुखकडे असताना यांनी राजकारण केले जिल्ह्यातील अनेक संस्था अडचणीत असताना मदत केली नाही शरद पवार यांनी पक्ष न पाहता सगळ्यांना मदत केली म्हणून आज महाविकास आघाडीकडे पाठिंबा वाढत आहे वाढप्या ओळखीचा असल्यास ताटात जास्त पडते नानांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी भगीरथला विधानसभेत पाठवा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या लक्ष्मी दहिवडी येथील प्रचार सभेत केले.या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे आ संजय मामा शिंदे उत्तम जानकर दीपक साळुंखे उमेश पाटील सुरेश घुले कल्याणराव काळे अनिल सावन्त लतीफ तांबोळी भारत बेदरे शिवाजीराव काळूगे जयमाला गायकवाड सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

             

                 या वेळी बोलताना अजित पवार यांनी बसवेश्वर स्मारक निधी मंजूर केला आहे लवकरच उभा करू असे सांगत राजू शेट्टीला सोडण्याचा नाद लाल दिव्याच्या गाडीमुळे सदाभाऊ खोत यांनी केला अशी अनेक मंडळी आपल्या लोकांना फसवत आहेत त्यांना दाद देऊ नका ज्यांनी स्वतःच्या दूध संस्था साखर कारखाने बँका बंद पाडल्या ते आज विठ्ठल आणि सहकार शिरोमणी वर बोलत आहेत संस्था अडचणीत आहेत पण नक्कीच त्यांना ताकद दिली जाईल  पाणी मर्यादित वापरण्यासाठी नवे तंत्रज्ञान आले आहे याचा लाभ घ्या बारामतीला या अनुभव घ्या असे सांगितले स्वतःच्या जीवाची काळजी न घेतल्याने नाना आज आपल्यात नाहीत त्यांचे कार्य पूर्ण करू असे शेवटी सांगितले

           पालकमंत्री भरणे यांनी या वेळी पोटनिवडणुकीसाठी मतदान करत असताना मतदारसंघात असलेल्या समस्या आणि कामे मार्गी लावण्यासाठी आ भारत भालके सतत जयंत पाटील यांना भांडायचे हे मी पाहत आलो पण त्यांची अपूर्ण स्वप्ने साकार करण्यासाठी भगीरथ ला पाठिंबा द्या असे आवाहन केले तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ता मागितलेल्या भाजपला कधीही आरक्षण द्यावे वाटले नाही समाजावर अन्याय केला आता पोटनिवडणुकीत याच मुद्द्यावर अजून मते मागत आहेत मात्र महाविकास आघाडी हे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे असे सांगितले.

             उमेदवार भगीरथ भालके यांनी बोलताना 2009 पासून  येथील मायमाऊलीनी नानांना घातलेलं साकडे पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करूनच दाखवली असे सांगत राहिलेली सर्व अपुरी कामे महाविकास आघाडीच्या ताकदीवर पूर्ण करण्यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन केले.

           उत्तम जानकर यांनी बोलताना आमच्यासारखे पुढारी हे मदत म्हणून दोन पैसे देऊ शकतात नोकरी लावतील मान सन्मान देतील पण आ भालके यांनी मतदारसंघासाठी जीव दिला आहे हे न विसरता त्यांचे हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही असे सांगितले पांडुरंग चौगुले यांनी प्रास्ताविक केले.

Pages