शैलाताई गोडसेच्या टिमला घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, April 11, 2021

शैलाताई गोडसेच्या टिमला घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन....


नंदेश्वर(विशेष प्रतिनिधी)

             पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लागल्यापासून शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या शैलाताई गोडसे या नेहमीच चर्चेत राहिल्या असून अखेरच्या टप्प्यात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून प्रचाराची यंत्रणाही अत्यंत नेटकेपणाने राबवली आहे.

              यामध्ये बेरोजगार युवक-युवतींना एकत्रित करून रोजंदारीवरती प्रचार करण्यास त्यांनी भाग पाडले असून यामध्ये ह्या  युवक-युवती गावामध्ये पत्रिका वाटणे,त्याचबरोबर मतदार बंधू-भगिनींना फोनद्वारे, संदेशाच्या व सोशल मिडीयाच्या माध्यमातून शैलाताई गोडसे यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत; मात्र शैलाताई गोडसे यांच्या कार्यालयातून एका मतदारराजाला फोन आल्यानंतर शैलाताई गोडसे यांना मतदान करण्याची विनंती केल्यानंतर त्या मतदारराजाने चक्क त्या युवतीला व शैलाताई गोडसे यांच्या टिमला सर्वांनी मिळून एकत्रितपणे घड्याळाला मतदान करण्याची त्या मतदारराजाने विनंती केलेली आहे.

            आणि याचीच चर्चा पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील प्रत्येक गावात रंगू लागली असून सोशल मिडियावरतीही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली असुन नेटकर्‍यांनी ही क्लिप मोठ्या प्रमाणात पसरवण्याचेही काम केलेले आहे.

Pages